esakal | अरे देवा... नसलेल्या बंगल्याच्या भाड्यासाठी मोजले ५० हजार!!
sakal

बोलून बातमी शोधा

bunglow fraud

अरे देवा... नसलेल्या बंगल्याच्या भाड्यासाठी मोजले ५० हजार!!

sakal_logo
By
नरेश शेंडे

मुंबई : सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून रिअल इस्टेट मालमत्तेच्या (Real Estate Property) अनेक जाहिराती प्रसिद्ध केल्या जातात. या जाहिरातींच्या माध्यमातून ग्राहकांना थेट ऑनलाईन पेमेंट (Online Payment) करुन संबंधित मालमत्तेचा ताबाकब्जा देण्यात येईल, असा मजकूर प्रसिद्ध केला जातो. मात्र, अशा जाहिराती (Fake Advertisement) कितपत खऱ्या आहेत, याची शहानिशा करणे हे अत्यंत महत्वाचे आहे. कारण, खोट्या जाहिरातीद्वारे अनेकांची फसवणूक (social media Fraud) झाल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. खोट्या बंगल्याच्या फोटोद्वारे (Fake Bunglow Photo) सोशल मीडियाच्या माध्यमातून ५० हजारांची (Fifty Thousand fraud) फसवणूक केल्याची अशीच एक घटना उघडकीस आली आहे. खोट्या बंगल्याचा फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध करुन पुण्याच्या दोन भामट्यांनी मुंबईतील मलबार हिल परिसरातील नागरिकाला ५० हजारांचा गंडा घातला आहे. ( Fake bunglow advertisement Cost Fifty thousand to mumbai resident two arrested )

हेही वाचा: 'हौसले झुक ना पायेंगे...'; फडणवीसांचा सरकारला शायरीतून इशारा

लोणावळ्यात बंगला भाड्याने देण्यात येईल, असा फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यानंतर मुंबईतील मलबार हिलच्या एका नागरिकाने कुटुंबासह सुट्टीच्या दिवशी लोणावळ्यात राहण्यासाठी बंगल्याची बुकिंग केली. परंतु, सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्त्यावर बंगलाच उपलब्ध नसल्याचे मुंबईच्या नागरिकाच्या निदर्शनात आले. त्यानंतर आपली फसवणूक झाली असल्याचं मुंबईतील नागरिकाच्या लक्षात आलं. त्यानंतर त्या नागरिकाने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी पुण्यातील दोघा भावांना अटक केली आहे. अविनाश जाधवानी (२६) आणि आकाश जाधवानी (२२) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पुण्यात राहणाऱ्या या दोन भावांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

loading image