esakal | 'हौसले झुक ना पायेंगे...'; फडणवीसांचा सरकारला शायरीतून इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra-Fadnavis-Shayari

'हौसले झुक ना पायेंगे...'; फडणवीसांचा सरकारला शायरीतून इशारा

sakal_logo
By
विराज भागवत

"हे राष्ट्रवादीचं सरकार आहे... ठाकरेंचा केवळ मुखवटा वापरला जातोय"

मुंबई: विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजपाच्या (BJP) १२ आमदारांचे वर्षभरासाठी निलंबन करण्यात आलं. या मुद्यावरुन भाजपा आक्रमक झाली. विधीमंडळाच्या पायऱ्यांवरच (Maharashtra assembly) भाजपाने प्रति विधानसभा (Vidhan Sabha) सुरु केली. विधासनभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात निषेधाचा प्रस्ताव मांडला. पण त्यांच्याकडून माईक आणि स्पीकर काढून घेण्यात आला. त्यानंतरही त्यांनी आपली भूमिका कायम ठेवत सरकारवर टिकास्त्र सोडलं आणि प्रति-विधानसभा सुरूच ठेवली. काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांना राष्ट्रवादीचे नेते फसवत आहेत अशी टीका त्यांनी केली आणि आपल्या भाषणाच्या शेवटी शायरीतून सरकारला इशारा दिला. (Devendra Fadnavis Shayari in Maharashtra Vidhan Sabha Adhiveshan BJP Warning Mahavikas Aghadi Govt)

हेही वाचा: विधानभवनाबाहेर राडा; भाजप नेत्यांकडून माईक, स्पिकर काढून घेतला...

"राज्याचे सरकार हे तीन पक्षांचे आहे. पण खरं पाहिलं तर एकाच गोष्टीसाठी शिवसेनेला ५० हजार कोटी आणि काँग्रेसला एक लाख कोटी देण्यात आले. स्वत: राष्ट्रवादीने मात्र २.२३ लाख कोटी वापरले. यावरून हे स्पष्ट होतं की हे ठाकरे सरकार नाहीये. हे राष्ट्रवादीचे सरकार आहे. ठाकरे यांचा केवळ मुखवटा वापरला जात आहे. अशा विविध प्रकारच्या भ्रष्टाचारांची आम्ही पोलखोल करू याची भीती वाटत असल्याने आमच्या आमदारांना खोटेपणा करून निलंबित केलं गेलं", अशी टीका फडणवीस यांनी केली.

त्यासह, विरोधकांचा आवाज जर दाबण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही गप्प बसणार नाही असं सांगत एका शायरीतून त्यांनी सरकारला इशारा दिला.

बंद करो आवाज चाहे, हम न अब कतरायेंगे

चाहे जितने जुल्म करो, ये हौसले झुक ना पायेंगे...

हेही वाचा: भाजप आमदार गावगुंडाप्रमाणे वागले; जाधवांचा हल्लाबोल

फडणवीसांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे-

  • महाराष्ट्रात बोगस लसीकरण सरकारने केले. विमा कंपन्यांशी साटंलोटं सरकारने केले आणि फायदा कंपन्यांना दिला. पीक विमा शेतकऱ्यांना मिळणार नाही यासाठी सरकारने नियम केले. आता ते लोक कुठे गेले जे कंपन्यांचे कार्यालय फोडायचे? कंपन्यांनी त्यांना काय लॉलीपॉप दिले माहीत नाही.

  • सरकारने धान घोटाळा केला. भंडारा येथील ए ग्रेड धान दुसरीकडे पाठवले जात आहे. धान घोटाळ्याची CBI चौकशी केली पाहिजे. जवळच्या लोकांना धान खरेदीसाठी परवानगी दिली. 50 टक्के बोनस दिला गेला नाही. हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार धान घोटाळ्यात झाला. केवळ 20 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला. खासगी बियाणे कंपन्याना फायदा व्हावा यासाठी महाबीज बियाणे अधिक तयार केले नाही.

हेही वाचा: अजित पवारांनी महात्मा गांधींच्या विचारांची हत्या केली - सुधीर मुनगंटीवार

  • इंग्रजांना, निजामांना जमले नाही ते ठाकरे सरकारने केले. वारी परंपरा सरकारने मोडीत काढली. अनेक संत पोलिसांच्या पाहऱ्यात आहेत जणू काही ते आरोपी आहेत.

  • पीक विमा, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, पेट्रोल भाव वाढले, लसीकरण कमी झाले.... साऱ्यासाठी केंद्र सरकार जबाबदार असं सांगत आहेत. मग हे सरकार भजी तळायला बसले आहे का?

  • सरकारच्या सर्व खात्यात वसुली सुरू आहे. प्रत्येक विभागातील वाझे पुढे आणला तर धक्का बसेल. संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान दिले नाही. मुंबईकरांना मेट्रो तीन पासून वंचित ठेवण्याचे काम या सरकारने केले. मेट्रोची किंमत दहा हजार कोटींनी सरकारने वाढवली. बीडीडी चाळीच्या पूर्वसनाचा बदल या सरकारने केला. 155 कोटी खर्च प्रसिद्धीवर सरकारने केले. जलसंधारण विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. भ्रष्टाचार संभाषणाच्या सीडी आमच्याकडे आहेत, लवकरच प्रसिद्ध करू.

loading image