जीएसटीची बनावट बिले उघड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

GST

जीएसटीची बनावट बिले उघड

मुंबई - महाराष्ट्र जीएसटीच्या विश्लेषणात्मक साधनांद्वारे आणि जीएसटी पोर्टलवर उपलब्ध माहितीद्वारे नवीन नोंदणीकृत करदात्यांच्या गटाचे विश्लेषण करताना विभागाला काही करदात्यांचे २०० कोटींपेक्षा जास्त रकमेचे संशयास्पद व्यावसायिक व्यवहार लक्षात आले. महाराष्ट्र राज्य जीएसटीच्या पथकांद्वारे सोमवारी उल्हासनगर येथील मे. एम्पायर एंटरप्राइजेस, मे. शंकर एंटरप्रायझेस आणि मे.एम.एम. एंटरप्रायझेस या करदात्यांच्या विविध व्यावसायिक ठिकाणी तपासणी केली. त्यात या सर्वांनी वीज बिलांसारखी बनावट कागदपत्रे देऊन आणि जागा मालकांची परवानगी न घेताच भाडे-परवाना करार करून जीएसटी नोंदणी मिळवली असल्याचे आढळून आले. या करदात्यांनी २१८.२६ कोटी रुपये किमतीच्या करपात्र मूल्याच्या बनावट पावत्या इतर करदात्यांना कोणत्याही वस्तू किंवा सेवांचा पुरवठा न करता त्यांनी त्यांच्या लाभार्थींना ३९.२८ कोटींचा आयटीसी दावा केला असल्याचे आढळले.

Web Title: Fake Gst Bills Exposed

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Mumbai NewsGSTtax
go to top