esakal | तोतया आयपीएस अधिकाऱ्यास अटक; व्यावसायिकाचे अपहरण करत उकळली 16 लाखांची खंडणी
sakal

बोलून बातमी शोधा

तोतया आयपीएस अधिकाऱ्यास अटक; व्यावसायिकाचे अपहरण करत उकळली 16 लाखांची खंडणी

सूरतमधील व्यावसायिकाचे मुंबईतून अपहरण करून 16 लाखांची खंडणी उकळणाऱ्या तोतया आयपीएस अधिकाऱ्याला गुन्हे शाखेने अटक केली. महसूल गुप्तवार्ता संचालनालयामध्ये (डीआरआय) तक्रार असल्याचे सांगून दक्षिण मुंबईतील हॉटेलमधून बंदुकीच्या धाकावर या व्यावसायिकाचे अपहरण करण्यात आले होते.

तोतया आयपीएस अधिकाऱ्यास अटक; व्यावसायिकाचे अपहरण करत उकळली 16 लाखांची खंडणी

sakal_logo
By
अनिश पाटील

मुंबई : सूरतमधील व्यावसायिकाचे मुंबईतून अपहरण करून 16 लाखांची खंडणी उकळणाऱ्या तोतया आयपीएस अधिकाऱ्याला गुन्हे शाखेने अटक केली. महसूल गुप्तवार्ता संचालनालयामध्ये (डीआरआय) तक्रार असल्याचे सांगून दक्षिण मुंबईतील हॉटेलमधून बंदुकीच्या धाकावर या व्यावसायिकाचे अपहरण करण्यात आले होते. पोलिसांनी गुजरात ते बंगळूरू असा आरोपीचा पाठलाग करून त्याला अटक केली. आरोपी अशा फसवणुकीच्या पैशांतून उच्च्भ्रू जीवन जगत होता. 

'एफडीए'ची मोठी कारवाई! तब्बल 35 लाखांचा पान मलासा जप्त; अवैध वाहतूक करणार्‍यांवर दक्षता पथकाचा छापा

शीवशंकर शर्मा (38) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, राजस्थानमधील अजमेर येथील तो रहिवासी आहे. कापड निर्यातदार असलेल्या गुजरातमधील व्यावसायिक मोहम्मद इस्तेशाम अस्लाम नावीवाला यांच्या तक्रारीवरून आरोपीला अटक करण्यात आली. सीमाशुल्क बुडवल्याचे सांगत प्रकरण मिटवण्यासाठी स्वतःला वरिष्ठ आयपीएस अधिकार म्हणवणाऱ्या शर्माने नावीवाला यांच्याकडे पैशांची मागणी केली होती; मात्र बोलणी फिस्कटल्याने त्याने दक्षिण मुंबईतील एका हॉटेलमधून बंदुकीच्या धाकाने नावीवाला यांचे अपहरण केले. या वेळी गुजरातमध्ये गाडीतून नेताना त्यांच्याकडून 16 लाख रुपयांची खंडणी उकळली. याप्रकरणी नावीवाला यांनी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवत आरोपी शर्मा याला अटक केली. फसवणुकीच्या पैशातून आरोपी आलिशान जीवन जगत होता. त्याची स्वतःची महागडी कार असून, त्याने आयपीएस अधिकाऱ्याचा गणवेशही शिवला आहे. याशिवाय त्याच्याकडे बंदूकही असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी आरोपीच्या साथीदाराची ओळख पटली असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. 

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणः तिन्ही आरोपींना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

अनेकांची फसवणूक 
आरोपी शर्मा सराईत असून यापूर्वीही अशा प्रकारे त्याने अनेकांची फसवणूक केली आहे. मध्य प्रदेशातील एका ढाबा मालकाची आयपीएस अधिकारी असल्याचे सांगून त्याने फसवणूक केली होती. त्याप्रकरणी त्याला स्थानिक पोलिसांनी अटक केली होती. याशिवाय गुजरातमधील एका महिला पोलिसाचीही आरोपीने लग्न करण्याच्या नावाखाली फसवणूक केली होती. आरोपीने तिच्याशी लग्नाच्या बहाण्याने लाखो रुपये घेतले व त्यानंतर तिच्यासोबत सर्व संबंध तोडून टाकले होते. 
-------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)