esakal | फेक टीआरपी प्रकरण! कोलवडेला पोलिस कोठडी मिश्राला जामीन; आतापर्यंत 10 जण ताब्यात 
sakal

बोलून बातमी शोधा

फेक टीआरपी प्रकरण! कोलवडेला पोलिस कोठडी मिश्राला जामीन; आतापर्यंत 10 जण ताब्यात 

बनावट टीआरपीप्रकरणी गुन्हेशाखेने रविवारी (ता.26) अटक केलेला मॅक्‍स मीडियाच्या अमित उर्फ अजित ऊर्फ अभिषेक भजनदास कोलावडेला याला न्यायालयीने पोलिस कोठडी सुनावली.

फेक टीआरपी प्रकरण! कोलवडेला पोलिस कोठडी मिश्राला जामीन; आतापर्यंत 10 जण ताब्यात 

sakal_logo
By
अनिश पाटील


मुंबई : बनावट टीआरपीप्रकरणी गुन्हेशाखेने रविवारी (ता.26) अटक केलेला मॅक्‍स मीडियाच्या अमित उर्फ अजित ऊर्फ अभिषेक भजनदास कोलावडेला याला न्यायालयीने पोलिस कोठडी सुनावली. तर या प्रकरणातील अटक आरोपी उमेश मिश्राला सोमवारी (ता.26) जामीन मिळाला आहे. आतापर्यंत या प्रकरणी 10 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

राज्यात कोरोना चाचण्यांच्या दरात चौथ्यांदा घट; आरोग्यमंत्र्यांचा सर्वसामान्यांना दिलासा

रविवारी (ता.25) या प्रकरणी गुन्हे शाखेने कोलावडेला अटक केली होती. कोलावडे याचा गेल्या अनेक दिवसांपासून शोध सुरू होता. अखेर रविवारी (ता.25) तो पोलिसांसमोर शरण आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. सोमवारी त्याला न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने कोलावडेला 28 ऑक्‍टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर या प्रकरणातीलल आणखी एक आरोपी उमेश मिश्राची 50 हजार रुपयांचा जामीन मिळाला आहे.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाच्या लायकीची व्यक्ती नाही; नारायण राणेंचा हल्लाबोल

कोलावडे पूर्वी याप्रकरणी हरिष पाटील, दिनेश विश्वकर्मा (37) व रामजी वर्मा (44), हंसा कंपनीचा विशाल वेद भंडारी (21), अंधेरीतील बोमपेली नारायण मिस्त्री (44), बॉक्‍स सिनेमाचे नारायण नंदकिशोर शर्मा (47), फक्त मराठीचे शिरीष सतीश पत्तनशेट्टी (44) आणि उत्तर प्रदेशमधून विनय त्रिपाठी व उमेश मिश्रा यांना अटक करण्यात आली आहे.

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image
go to top