Fake TRP Case: रिपब्लिक टीव्ही चॅनेलचे सीईओ विकास खानचंदानीला अटक

पूजा विचारे
Sunday, 13 December 2020

फेक टीआरपी घोटाळ्यात मुंबई पोलिसांनी रिपब्लिक टीव्ही चॅनेलचे सीईओ विकास खानचंदानीला अटक करण्यात आली आहे.

मुंबईः फेक टीआरपी घोटाळ्यात मुंबई पोलिसांनी रिपब्लिक टीव्ही चॅनेलचे सीईओ विकास खानचंदानीला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी रविवारी सकाळी ही कारवाई केली आहे. फेक टीआरपी घोटाळ्यात आतापर्यंत १३ लोकांना अटक केली आहे.

फेक टीआरपी घोटाळ्याप्रकरणी विकास खानचंदानीची चौकशी सुरु आहे. याआधी रिपब्लिक टीव्ही चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयानं जामीन मंजूर केला. तसंच रिपब्लिक टीव्हीचे वितरण प्रमुख घनश्माम सिंहला देखील या प्रकरणी अटक केली होती. विकास खानचंदानीला अटक करण्यापूर्वी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचद्वारे १२ लोकांना अटक करण्यात आली आहे. 

मुंबई पोलिसांनी रिपब्लिक टीव्ही चॅनेलच्या फेक टीआरपी घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता. बॅरोमीटर बदलून टीआरपी संख्या वाढवली जात होती. मुंबई पोलिसांनी या संबंधित कारवाई करत काही लोकांना अटक केली. अटक केलेल्या सर्वांची चौकशी करण्यात आली होती. या चौकशी दरम्यान आरोपी लोकांना रिपब्लिक टीव्ही चॅनेलचं भाडं देऊन चॅनेल बघण्यासाठी भाग पाडत होते.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

रिपब्लिक टीव्ही चॅनेलच्या टीआरपीमध्ये घोटाळा असल्याचा दावा मुंबई पोलिसांकडून करण्यात आला होता. पोलिसांचं म्हणणं आहे की, बॅरोमीटर बदलून टीआरपीचा आकडा वाढवण्यात येत होता.  समोर आलेल्या माहितीनुसार, या घोटाळ्यात BARC आणि हंसाच्या माजी कर्मचाऱ्यांनी सुरु केलं होतं. आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, यात फक्त मराठी, बॉक्स सिनेमा आणि रिपब्लिक टीव्ही चॅनेल्सना ही चुकीट्या पद्धतीनं टीआरपीचा फायदा मिळाला आहे.

हेही वाचा-  बारावी परीक्षेचे अर्ज भरण्यास 15 डिसेंबरपासून सुरुवात

Fake trp scam case Republic TV CEO Vikas Khanchandani Arrested


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fake trp scam case Republic TV CEO Vikas Khanchandani Arrested