esakal | बोगस लसीकरण प्रकरणातील आरोपींचा जामीन हायकोर्टाने फेटाळला
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai High Court

बोगस लसीकरण प्रकरणातील आरोपींचा जामीन हायकोर्टाने फेटाळला

sakal_logo
By
सुनिता महामुनकर

मुंबई : बोगस लसीकरण (Fake Vaccination) प्रकरणात आरोपी असलेल्या दोन जणांचा जामीन मुंबई सत्र न्यायालयाने (mumbai high court) नुकताच नामंजूर केला. भोईवाडा पोलीस ठाण्यात (bhoiwada police station) त्यांच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल केला आहे. आरोपी श्रीकांत माने आणि सीमा आहुजा यांनी न्यायालयात (Court) जामीनासाठी अर्ज केला होता. आरोपी महेंद्र सिंह याच्या सांगण्यावरून आम्ही यात सहभागी झालो आणि आम्ही लसही घेतली होती. पण जेव्हा प्रमाणपत्र (certificate) मिळाले नाही तेव्हा सिंह विरोधात पोलीस तक्रार केली आहे, असा दावा त्यांनी केला.

हेही वाचा: साकीनाका दुर्देवी घटनेचे राजकारण करु नका - संजय राऊत

अतिरिक्त सत्र न्यायाधीश चित्रा हंकारे यांनी दोघांचा अर्ज नामंजूर केला. आरोपी साक्षी पुरावे प्रभावित करु शकतात आणि संबंधित प्रकरण गंभीर आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. परळमध्ये पोद्दार सेंटरसह विविध ठिकाणी आयोजित कैम्पमध्ये आरोपी सहभागी झाले होते असा गुन्हा पोलिसांनी नोंदवला आहे..

loading image
go to top