esakal | साकीनाका दुर्देवी घटनेचे राजकारण करु नका - संजय राऊत
sakal

बोलून बातमी शोधा

sanjay raut

साकीनाका दुर्देवी घटनेचे राजकारण करु नका - संजय राऊत

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई : साकीनाकासारखी घटना (Sakinaka Rape Case) दुर्देवी आहे. त्या महिलेला वाचविण्याचे प्रयत्न झाले. पण, यश आले नाही. ही विकृती आहे. या दुर्देवी घटनेचे राजकरण (politics) व्हायला नको. विरोधी पक्षाने (Opposition Party) भूमिका मांडलीच पाहिजे. पण, या घटनेचे राजकरण करणे म्हणजे दुर्देवी मृताच्या टाळू वरचे लोणी खाण्यासारखे आहे. ही विकृती ठेचायलाच हवी. अशी भावना आज शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केली.

हेही वाचा: साकीनाका बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या - रामदास आठवले

साकिनाका येथे आमनुष अत्याचार झालेल्या महिलेचा आज राजावडी रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर विरोधकांकडून होत असलेल्या आरोपबाबत बोलताना ते म्हणाले,"महाराष्ट्राच्या राजधानीत महिलांना नेहमीच सुरक्षेची भावना आहे.जगभरातील शहरांमध्ये महिलांच्या सुरक्षेबाबत मुंबईच्या स्थान वरच्या क्रमांकावर आहे.हा कायदा सुवस्थे बरोचर महिला सुरक्षेचा प्रश्‍न आहे.

सरकारचा,पोलिसांचा धाका जरी असला तरी ही विकृती आहे.काही वेळा ही विकृती उफाळून येते.गुन्हेगार फासावर जातील.असेही त्यांनी नमुद केले.अशा घटना राज्याला खाली मान घालवणाऱ्या असतात.त्या महिलेला वाचविण्याचे प्रयत्न झाले.तीचे स्टेटमेंट घेता असते तर पोलिसांनी अधिक माहिती मिळाली असती.पोलिसांनी सीसीटीव्ही आणि इतर लिंकच्या माध्यमातून मुख्य आरोपीला पकडले आहे.त्याला कठोरात कठोर फाशीची शिक्षाही व्हावी.आपल्या संवेदना तीच्या बरोबर ठेवला पाहिजे.या विकृतीवर उपाय का याचा विचार करायला हवा.असेही त्यांनी नमुद केले.

अशा दुर्देवी घटना घडू नये म्हणून सरकारला अधिक कठोर पावले उचलावी लागतील.ही घटना घडत असताना पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला स्थानिकांकडून फोन आला.पोलिसांनीही तत्काळ पाऊले उचलली.सरकार आणि पोलिसांचा धाक आहेच.असेही त्यांनी सांगितले. महापौर किशोरी पेडणेकर यांनी सकाळी राजावाडी रुग्णालयात जाऊन या महिलेच्या प्रकृतीचा आढावा घेतला होता.ही महिला व्हेंटीलेटरवर होती.तीची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने स्टेटमेंट घेता आली नाही.रुग्णालयात तीची आई होती.ही महिला आरोपी 10-12 वर्षांपासून परीचीत असल्याचे तीच्या आईने सांगितले असल्याचे महापौरांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

loading image
go to top