esakal | व्हायरल झालेल्या 'या' अधिसूचना खोट्या, सरकारकडून स्पष्टीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

व्हायरल झालेल्या 'या' अधिसूचना खोट्या, सरकारकडून स्पष्टीकरण

राज्य शासनाची अधिसूचना असलेलं पत्रक व्हायरल होत आहे. यात लॉकडाऊनसंदर्भात काही नियम शिथिल करण्यात आल्याचं नमूद करण्यात आलं आहे. यावर राज्य सरकारनं स्पष्टीकरण दिलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अधिसूचना राज्य शासनानं जारी केलेल्या नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

व्हायरल झालेल्या 'या' अधिसूचना खोट्या, सरकारकडून स्पष्टीकरण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई- सध्या राज्यात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु आहे. हा टप्पा संपायला शेवटचे तीन दिवस बाकी आहेत. त्यातच राज्यात लॉकडाऊन 5.0 असेल का याबाबत लोकांमध्ये संभ्रम असताना सोशल मीडियावर लॉकडाऊन संदर्भात राज्य शासनाची अधिसूचना असलेलं पत्रक व्हायरल होत आहे. यात लॉकडाऊनसंदर्भात काही नियम शिथिल करण्यात आल्याचं नमूद करण्यात आलं आहे. यावर राज्य सरकारनं स्पष्टीकरण दिलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अधिसूचना राज्य शासनानं जारी केलेल्या नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

फॉर्च्युन हॉटेलमधल्या भीषण आगीतून 'त्या' डॉक्टरांची सुटका

महाराष्ट्र शासन माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयानं आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या अधिसूचना राज्य शासनाने जारी केलेल्या नाहीत.

काय म्हटलं आहे या अधिसूचनेत 

या अधिसूचनेत रेड झोन वगळता मॉल, मार्केट कॉम्पेक्स सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. 33 टक्क्यांपर्यत परिसरातील दुकानं सुरु होणार असल्याचं यात नमूद केलं आहे. तसंच यात दोन ते तीन प्रकारचे गट केलेत. त्यानुसार कोणत्या दिवशी कोणती दुकानं सुरु असतील असं म्हटलं आहे. 

सर्व प्रकारची दुकानं सुरु करण्याची यात परवानगी दिली आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत दुकानदारांना दुकानं सुरु ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे. दुकानदारांना टोकन सिस्टम किंवा स्लॉटचं वाटप करुन गर्दी हाताळता येईल असंही म्हटलं आहे. इतकंच काय तर, याची अंमलबजावणी येत्या 29 मे रोजीपासून लागू होणार असल्याचंही नमूद केलं आहे. 

मोठी बातमी: महाराष्ट्रात असा असेल लॉकडाऊन 5.0; जयंत पाटलांनी दिले संकेत
 

यावर आता राज्य सरकारनं स्पष्टीकरण दिलं आहे. या प्रकारचे कोणत्याही अधिसूचना राज्य शासनानं जारी केल्या नसून या अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे.

loading image
go to top