esakal | "कोरोना नसतानाही आमच्या पेशंटवर कोविड औषधांचा वापर, म्हणूनच रुग्णाचा झाला मृत्यू", मुंबईतील रुग्णालयाबाहेर नातेवाईकांचा गोंधळ
sakal

बोलून बातमी शोधा

"कोरोना नसतानाही आमच्या पेशंटवर कोविड औषधांचा वापर, म्हणूनच रुग्णाचा झाला मृत्यू", मुंबईतील रुग्णालयाबाहेर नातेवाईकांचा गोंधळ

कोरोनाच्या संवेदनशील काळात मुंबईत सर्वाधिक कोविड रुग्णांची नोंदणी झाली. स्वाभाविकपणे मुंबईतील रुग्णालयांवर आरोग्य यंत्रणा सांभाळण्याचा प्रचंड प्रचंड ताण आहे.

"कोरोना नसतानाही आमच्या पेशंटवर कोविड औषधांचा वापर, म्हणूनच रुग्णाचा झाला मृत्यू", मुंबईतील रुग्णालयाबाहेर नातेवाईकांचा गोंधळ

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई - कोरोनाच्या संवेदनशील काळात मुंबईत सर्वाधिक कोविड रुग्णांची नोंदणी झाली. स्वाभाविकपणे मुंबईतील रुग्णालयांवर आरोग्य यंत्रणा सांभाळण्याचा प्रचंड प्रचंड ताण आहे. मात्र या ताण-तणावात मुंबईतील हॉस्पिटल्सकडून काही भयंकर आणि अक्षम्य चुका झाल्याचंही समोर आलंय. काहीवेळेस एका रुग्णाच्या नावाने दुसऱ्या कोविड रुग्णाचा मृतदेह कुटुंबाकडे सोपवणे, रुग्णालयातून रुग्ण गायब होणे आणि रुग्णांचे मृतदेह गायब होणं असे भयंकर प्रकार याआधीच समोर आलेत. आता अशा प्रकरणात आणखीन एक गंभीर बाब समोर आली आहे. कोरोना नसतानाही रुग्णावर कोरोनाचे उपचार केल्याचा गंभीर आरोप करत मुंबईतील माहीमच्या फॅमिली केअर सेंटरमध्ये नातेवाईकांनी गोंधळ घातलाय. 

महत्त्वाची बातमी - कोरोनाची 'उलटी गिनती' कधी सुरु होणार? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केला 'मोठा' खुलासा...

टीव्ही रिपोर्टनुसार २५ जुलै रोजी उपचारादरम्यान ३२ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला होता. धक्कादायक बाब म्हणजे दुसऱ्या कोरोना रुग्णांसाठी आणलेल्या औषधांचा कोरोना नसलेल्या रुग्णावर वापर करण्यात आला आणि त्यामुळेच आपल्या नातेवाईकाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबाकडून केला जातोय. मृत व्यक्तीचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर आता नातेवाईक चांगलेच आक्रमक झालेत. दरम्यान माहीमच्या  'फॅमिली केअर सेंटर' रुग्णालयात चुकीचे उपचार करण्यात येतात असा आरोप मृतकाच्या नातेवाईकांनी केलाय. 

मोठी बातमी - सोसायटीत चक्कर मारताना कशाला हवा मास्क ? आधी ही बातमी वाचा, नाहीतर बसेल मोठा आर्थिक फटका...

आणखीन काय आहेत आरोप ? 

या रुग्णालयात पूर्णवेळ MBBS आरएमओ नसतो, सोबतच या रुग्णालयात जिथे डॉक्टरांच्या सह्या हव्यात तिथे सिस्टर्स डॉक्टरांच्या सह्यांची नक्कल करत असल्याचाही आरोप या रुग्णालयावर लावण्यात येतोय. दरम्यान आता याप्रकरणी महापालिका प्रशासन लक्ष घालून कारवाई करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

family of patient alleged hospital for treating non covid patient with covid medicines 

loading image