प्रसिद्ध् 'कार' डिझायनर दिलीप छाब्रीयाला पोलिस कोठडी; 2 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी

अनिश पाटील
Tuesday, 29 December 2020

डीसी डिझइनचे संस्थापक आणि प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाब्रीया यांना फसवणूक प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुप्तवार्ता (सीआययू) पथकाने अटक केली होती.

मुंबई - डीसी डिझइनचे संस्थापक आणि प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाब्रीया यांना फसवणूक प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुप्तवार्ता (सीआययू) पथकाने अटक केली होती. याप्रकरणी न्यायालायने त्यांना 2 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी पोलिसांनी छाब्रीया यांची पॉश कारही जप्त केली आहे. तर छाब्रीया याने क्रिकेटर दिनेश कार्तीकला देखील फसविल्याचे उघड झाले आहे. सीआययूचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन वझे यांना माहिती मिळाली होती कि, नरीमन पॉईंट परिसरात एक बनावट नंबर प्लेट असलेली स्पोर्टस कार येणार आहे. त्यानुसार, वझे यांनी सापळा लावला होता. मात्र या ठिकाणी संबधीत स्पोर्टस कार आली नाही. त्यानंतर दुस-या दिवशी हॉटेल ताज परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर वझे यांच्या पथकाने या ठिकाणी पुन्हा सापळा लावला. अशातच एक स्पोर्टस कार या ठिकाणी दाखल झाली. यादरम्यान, पोलिसानी याची झडती घेतली असता, या कारवर बनावट नंबर प्लेट असल्याचे निदर्शनास आले. तसेच त्याचा चेसी नंबर देखील बदलल्याचे पोलिसांना आढळले. त्यानुसार, पोलिसांनी ही कार ताब्यात घेत, ती बनविणा-या दिलीप छाब्रीयाला अटक केली. ही कार चेन्नई येथे रजिस्टर असल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. याप्रकरणी त्यांचा मुलगा बोनिटो छाब्रिया यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

यापूर्वी क्रिकेटर दिनेश कार्तिकचीही फसवणूक
 क्रिकेटर दिनेश कार्तीक याने या कंपनीचा मालक छाब्रीया विरोधात न्यायालयात तक्रार केल्याचे समजले. त्याने दिनेश कार्तीकला कार देतो असे सांगत 5 लाख रुपये अॅडव्हान्स घेतल्याचे देखील समोर आले होते. तससेच छाब्रीया याने त्याच्या कंपनीच्या माध्यमातुन 120 स्पोर्टस कार देश परदेशात विकल्या असुन, यातील सरासरी एका कारवर 42 लाख एवढे कर्ज असल्याचे समोर आले आहे. तर यातील 90 कारमध्ये आर्थीक घोटाळा असुन, याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Famous car designer Dilip Chhabria in police custody Police custody

-------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Famous car designer Dilip Chhabria in police custody Police custody