कोरोनाशी लढताना 'या' प्रसिद्ध डॉक्टरने गमावले प्राण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पराग पाटील

कल्याणमधील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. पराग पाटील यांचे करोना संसर्गाशी लढताना निधन झाले.

कोरोनाशी लढताना 'या' प्रसिद्ध डॉक्टरने गमावले प्राण

कल्याण : कल्याणमधील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ आणि ' कल्याण आयएमए 'चे डॉ. पराग पाटील यांचे आज कोरोना संसर्गाशी लढताना निधन झाले. ते 53 वर्षांचे होते. डॉ. पराग पाटील हे वैद्यकीय क्षेत्रात एक नामांकित स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. गेल्या 20-25 दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथेच आज त्यांची प्राणज्योत मालवली.

करोना रुग्णांवर कल्याण इंडियन मेडीकल असोसिएशनमार्फत 'कल्याण डॉक्टर्स आर्मी' अंतर्गत उपचार केले जात आहेत. या डॉक्टर्स आर्मीमध्ये डॉ. पराग पाटील हे देखील सुरुवातीपासून कार्यरत होते. डॉ. पराग पाटील यांच्या पश्चात पत्नी (स्त्रीरोग तज्ञ) आणि दोन मुली असा परिवार आहे.

चिंताजनक...जगभरात घट; मात्र देश अन् राज्यातील मृत्युदर वाढला

Web Title: Famous Gynecologist Kalyan Dr Parag Patil Dies Due Corona

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top