चिंताजनक...जगभरात घट; मात्र देश अन् राज्यातील मृत्युदर वाढला

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 21 June 2020

जगभरातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदरात घट होत असतांना देशासह राज्यातील मृत्युदर मात्र वाढतांना दिसतोय.

मुंबई : जगभरातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदरात घट होत असतांना देशासह राज्यातील मृत्युदर मात्र वाढतांना दिसतोय. देशातील मृत्युदर 3.23 वर तर राज्यातील मृत्युदर 4.67 वर पोचला आहे. देशातील मृत्युदर 0.43 तर राज्यातील मृत्यूदरात 1.21 ने वाढ झाली असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

आठवड्याभरपूर्वी जगभरातील कोरोना रुग्णांचा आकडा 62 लाख 8 हजार 771 इतका होता, तर मृत्युदर 6.4 इतका होता. आठवड्याभरात रुग्णसंख्येत  वाढ होऊन तो  85 लाख 25 हजार 042 वर पोचला आहे. तर मृत्युदर 5.36 इतका आहे. जगभरातील कोरोना रुग्णांचा आकडा तब्बल 23 लाखांनी वाढला असला तरी मृत्यूदरात घट झाल्याचे दिसते. जगभरातील मृत्युदर 0.68 ने घटला आहे. जगभरात कोरोनामुळे चार लाख 63 हजार 244 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाबाॅम्ब ठरलेल्या धारावीतून गुड न्यूज

आठवड्याभरपूर्वी देशातील कोरोना रुग्णसंख्या ही दोन लाख 16 हजार 919 होती. तर मृत्युदर 2.80 इतका होता. आठवड्याभरात रुग्णांच्या संख्येत साधारणता दोन लाखांची भर पडून ती चार लाख 10 हजार 461 इतकी झाली आहे. तर मृत्युदरात वाढ होत तो 3.23 इतका झाला आहे. मृत्यूदरात 0.43 ने वाढ झाली आहे. देशभरात कोरोनामुळे 13 हजार 560 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात 6 हजार 144 रुग्णांचा मृत्यू
आठवड्याभरापूर्वी राज्यातील कोरोना रुग्णसंख्या ही 74 हजार 860 होती, तर मृत्युदर 3.46 इतका होता. आठवड्याभरात रुग्णांच्या संख्येत साधारणता  63  हजारांची भर पडून ती एक लाख 28 हजार 205 इतकी झाली आहे. तर मृत्युदरात वाढ होत तो 4.67 इतका झाला आहे. मृत्यूदरात 1.21  ने वाढ झाली आहे. राज्यात कोरोनामुळे सहा हजार 144 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

अरे देवा! दक्षिण मुंबईतल्या 'या' दोन इमारती ठरतायेत कोरोनाचा हॉटस्पॉट...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: death rate increased in india, maharashtra due to corona