

Farmer Loan Waiver Update Maharashtra Gives Relief to Zero ITR Filers Amid Income Tax Eligibility Condition
sakal
मुंबई : शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत शेती उत्पन्नाचे केवळ शून्य प्राप्तिकर विवरणपत्र (झिरो आयटीआर) दाखल करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बँक कर्ज किंवा इतर कायदेशीर कामांसाठी शून्य विवरणपत्र भरले असल्यास अशा शेतकऱ्यांना कर्जमुक्तीच्या लाभापासून वंचित ठेवले जाणार नाही. मात्र, गेल्या सहा वर्षांत एकदाही प्रत्यक्ष प्राप्तिकर भरलेला असल्यास संबंधित शेतकरी या योजनेसाठी पूर्णपणे अपात्र ठरेल, असे स्पष्टीकरण सहकार अन् पणन विभागाने दिले आहे.