esakal | शेतकऱ्यांना अखंड वीज पुरवठा करा - डॉ. नितीन राऊत | Nitin Raut
sakal

बोलून बातमी शोधा

nitin raut

शेतकऱ्यांना अखंड वीज पुरवठा करा - डॉ. नितीन राऊत

sakal_logo
By
- तेजस वाघमारे

मुंबई : रब्बी हंगामात शेतकऱ्यांना (farmers) उत्तम सेवा देण्यासाठी आणि रोहित्रे (Generator) नादुरुस्त होऊ नयेत यासाठी ऊर्जा विभागाच्या तीनही कंपन्यांनी एकमेकांशी समन्वय ठेवून वीज पुरवठा अखंडित (Electricity power) राहील याची काळजी घ्यावी, असे निर्देश उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांनी दिले आहेत. तसेच रोहित्र बंद पडून शेतकऱ्यांचा वीज पुरवठा ठप्प होणार नाही, यासाठी विशेष काळजी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

हेही वाचा: राज कुंद्रा प्रकरणातील वृत्तांकनाबाबत खुलासा करण्याचे हायकोर्टाचे निर्देश

रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर महावितरण, महापारेषण व महानिर्मिती यांच्या तयारीचा आढावा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी घेतला. यावेळी त्यांनी गेल्या वर्षी रब्बी हंगामामध्ये तिन्ही कंपन्यांनी उत्तम समन्वय साधून कृषि ग्राहकांना चांगली सेवा पुरवली याबद्दल तिन्ही कंपन्यांचे ऊर्जामंत्र्यांनी अभिनंदन केले. या वर्षी राज्यात सर्वत्र पाऊस पडत आहे. किंबहुना दुष्काळी भागातही अतिवृष्टी होत आहे. तसेच हळुहळु लॉकडाऊन मागे घेतला जात असून जीवन पूर्वपदावर येत आहे. यामुळे विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यासाठी मागील वर्षीप्रमाणेच तिन्ही कंपन्यांनी पुन्हा समन्वय साधून 2021 चा रब्बी हंगामात शेतकऱ्यांना उत्तम प्रकारची सेवा देणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

हेही वाचा: मुंबई : समुद्र किनारे पुन्हा काळवंडले; तिसऱ्यांदा तेल गळती

तसेच महावितरणच्या मुंबई मुख्यालयाने तेलाचा व वितरण रोहित्रांचा पुरेसा साठा उपलब्ध करावा जेणेकरून मागणीनुसार त्याचा पुरवठा केला जाईल. यंत्रणेची पूर्व हंगामी दुरूस्ती वेळेवर करावी. यंत्रसामुग्री व देखभालीसाठी लागणारे साहित्य क्षेत्रीय कार्यालयांना वेळेवर उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना राऊत यांनी केल्या. सोबत वीज चोरीला कसा आळा घालता येईल याचा तसेच महावितरणची हानी कशी टाळता येईल याचेही वरिष्ठांनी नियोजन करून क्षेत्रिय स्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करावे,” असे निर्देशही त्यांनी दिले.

स्थानिक लोकप्रतिनिधी सोबत चांगला जनसंपर्क ठेवून परिस्थिती आपण कशी हाताळणार याची कल्पना देण्याची सूचनाही त्यांनी केली. ज्याठिकाणी आणीबाणीची परिस्थिती निर्माण होईल अशा ठिकाणी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी, उप जिल्हाधिकारी, तहसिलदार संबधीत पोलीस अधिकारी, लोकप्रतिनिधी यांची मदत घ्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली. या बैठकीत राज्याच्या ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, संचालक (संचालन) संजय ताकसांडे, मराविमं सूत्रधारी कंपनीचे सल्लागार उत्तम झाल्टे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

loading image
go to top