esakal | राज कुंद्रा प्रकरणातील वृत्तांकनाबाबत खुलासा करण्याचे हायकोर्टाचे निर्देश | Raj kundra
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Kundra

राज कुंद्रा प्रकरणातील वृत्तांकनाबाबत खुलासा करण्याचे हायकोर्टाचे निर्देश

sakal_logo
By
सुनिता महामुनकर

मुंबई : पोर्नोग्राफी प्रकरणात (pornography case) अटक करण्यात आलेल्या उद्योगपती राज कुंद्रा (raj kundra) आणि त्याच्या कुटुंबाबाबत करण्यात आलेल्या वृत्तांवर संबंधित प्रसिध्दी माध्यमे, खासगी चैनल आणि ब्लॉगर्सनी ता 15 नोव्हेंबर पर्यंत खुलासा करावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai high court) दिले आहेत. कुंद्राची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टीने (shilpa shetty) यासंबंधी न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे.

हेही वाचा: बोगस, मगृर मार्शल अडचणीत; घाटकोपर मध्ये पोलीस ठाण्यात तक्रार

न्या गौतम पटेल यांच्या पुढे यावर शुक्रवारी सुनावणी झाली. अनेक ब्लॉगर आणि खासगी चैनल्सने याबाबत शेट्टी यांनी सहमतीने तोडगा काढला आहे. तसेच वादग्रस्त वृत्तेही हटविली आहेत, असे शिल्पाच्या वतीने सांगण्यात आले. एका माध्यमाने यावर न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे असेही यावेळी सांगण्यात आले. न्यायालयाने अन्य काही व्लौगर, खासगी चैनलला लेखी खुलासा करण्याचे निर्देश दिले आहेत.

माध्यमांमध्ये येणाऱ्या वृत्तामुळे शिल्पाच्या लहान मुलांवर होणाऱ्या परिणामांची चिंता उच्च न्यायालयाने मागील सुनावणीमध्ये व्यक्त केली होती. त्याचबरोबर माध्यमांवर सरसकट बंदी घालता येणार नाही असेही स्पष्ट केले होते. कुंद्राच्या अटकेनंतर विविध प्रकारची व्रुत्ते प्रसिद्ध झाली आहेत. यामुळे माझ्या खासगी जीवनावर, व्यावसायिक कामावर आणि मुलांवर परिणाम होत आहे, त्यामुळे असे व्रुत्तांकन करण्याला मनाई करावी, अशी मागणी शिल्पाने न्यायालयात दावा दाखल करून केली आहे. कुंद्राला महानगर दंडाधिकारी न्यायालयाने नुकताच सशर्त जामीन मंजूर केला आहे.

loading image
go to top