या तालुक्यातील शेतकरी ताेंडलीमुळे मालामाल!

ताेंडलीचे मळे
ताेंडलीचे मळे

अलिबाग : भात, नारळ, पांढरा कांदा आणि आंब्यासाठी प्रसिद्ध असलेले अलिबाग आता तोंडली उत्पादनात अग्रेसर आहे. या तालुक्‍यातील ७०० शेतकरी या उत्पन्नातून लखपती झाले आहेत. यंदा तर तब्बल १५ हेक्‍टरने हे क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे भविष्यात अलिबाग तोंडली उत्पादनाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.

अलिबाग तालुक्‍यातील शेतकरी १५-२० वर्षांपूर्वी तोंडली पिकाकडे वळले. सुरुवातीला चरी, खिडकी भागात तिची लागवड करण्यात येत होती. त्यानंतर कुरुळ, वेश्‍वी, कार्ले, सागाव, खंडाळे, कनकेश्‍वरफाटा, बामणगाव, बेलोशी, चिंचोटी, रामराज, कावाडे परिसरात मळे बहरू लागले. गेल्या या वर्षी या पिकाची ७५ हेक्‍टरवर लागवड करण्यात आली होती. दरवर्षी तोंडलीच्या पिकाचे क्षेत्र वाढत आहे. त्यामुळे उत्पादनातही वाढ होऊ लागली आहे.  तालुक्‍यात सुमारे ७०० पेक्षा अधिक तोंडली उत्पादक शेतकरी आहेत. त्यांना दरवर्षी पाच कोटी रुपयांपेक्षा अधिक फायदा होतो.


अलिबाग तालुक्‍यात तोंडली उत्पादन दरवर्षी वाढू लागले आहे. यंदा ९० हेक्‍टर क्षेत्रामध्ये लागवड करीत आहे. चांगला भाव मिळत असल्याने 
शेतकरी मोठ्या संख्येने या पिकाकडे वळले आहेत. चांगल्या नफ्यामुळे भविष्यात ही आकडेवारी वाढण्याची शक्यता अधिक आहे. 
- बी. आर. जानुगडे, तालुका कृषी अधिकारी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com