Farmers Protest | शेतकरी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत चोख पोलिस बंदोबस्त

अनिश पाटील
Sunday, 24 January 2021

केंद्र सरकारच्या कृषि कायद्यांविरोधात मुंबईत दाखल झालेल्या शेतकरी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुंबई  : केंद्र सरकारच्या कृषि कायद्यांविरोधात मुंबईत दाखल होणा-या शेतकरी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यादरम्यान, कोणताही अनुचीत प्रकार घडू नये, यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. 

दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक राज्यात वाहनांवरुन फेऱ्या काढल्या जात आहेत. महाराष्ट्रातही अखिल भारतीय किसान सभेने या मोर्चाचे आयोजन केले असून हा मोर्चा सध्या मुंबईच्या वेशीवर धडकला आहे. एकट्या नाशिक येथून 20,000 शेतकरी मोर्चात सहभागी झाले आहेत. हे शेतकरी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी राजभवनमध्ये पोहचतील आणि राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांच्याकडे मागणीची एक सनद देणार आहेत. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

मुंबई पोलिसही आगामी प्रजासत्ताक दिन व मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सज्ज झाले असून 100 अधिकारी व 500 पोलिस अंमलदारांच्या सहाय्याने आझाद मैदान परिसरात चौख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. याशिवाय मोर्चा येणा-या मार्गिकांवरही पोलिस पहारा देणार असून त्याची जबाबदारी स्थानिक पोलिसांना देण्यात आली आहे. याशिवाय राज्य राखीव पोलिस दलाच्या 9 प्लाटूनची मदत घेण्यात येणार असून गर्दीच्या ठिकाणी ड्रोनच्या सहाय्याने लक्ष ठेवण्यात येणार आहे. वाहतुक पोलिसांकडूनही विशेष उपाय योजना करण्यात येणार आहेत.

Farmers Protest in mumbai Adequate police security in Mumbai of the farmers march

------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers Protest in mumbai Adequate police security in Mumbai of the farmers march