Shahapur: इको-सेन्सेटिव्ह झोन मधून शहापुर तालुक्यातील बाधित क्षेत्र वगळण्यासाठी खासदारांना शेतकऱ्यांचे साकडे

Shahapur: इको-सेन्सेटिव्ह झोन मधून शहापुर तालुक्यातील बाधित क्षेत्र वगळण्यासाठी खासदारांना शेतकऱ्यांचे साकडे

Balya Mama Mhatre: निवासी संकुले आणि गरीब शेतकरी यांच्या मालकीच्या जमिनीवर व विकास करण्याच्या हक्कावर गदा आणणारा आहे.

Eco-Sensitive Zone: 7 मे 2024 च्या केंद्रीय वनविभागाच्या अधिसूचनेनुसार तानसा अभयारण्याच्या हद्दीपासून प्रस्तावित इकोसेन्सेटिव्ह झोन हे 1 ते 9 कि. मी. क्षेत्रापर्यंत वाढ करण्याचा निर्णय हा शहापूर तालुक्यातील आधिच विकसित असलेल्या औद्योगिक क्षेत्र तसेच महामार्गालगत हॉटेल व्यवसाय, निवासी संकुले आणि गरीब शेतकरी यांच्या मालकीच्या जमिनीवर व विकास करण्याच्या हक्कावर गदा आणणारा आहे.

तानसा अभयारण्याच्या इकोसेन्सेटिव्हची वाढ करण्याचा निर्णय हा अशास्त्रीय व अन्यायकारक तसेच घाईघाईने घेण्यात आलेला आहे.या अन्यायकारक निर्णयाविरोधात शहापुरच्या शेतकऱ्यांसहित,विकासक,व्यापारी व कारखानदार यांनी दंड थोपटले असून ह्या निर्णयाविरोधात हजारो तक्रारी अर्ज करून हरकत घेतली आहे.या अन्यायकारक निर्णया विरोधात संसदेत विरोध दर्शविण्यासाठी तालुक्यातील बाधित नागरिकांनी भिवंडी लोकसभेचे खासदार बाळ्यामामा उर्फ सुरेश म्हात्रे यांना नुकतेच निवेदन देऊन साकडे घातले असून इकोसेन्सेटिव्ह झोन मधून शहापुर तालुका वगळण्यात यावा अशी मागणी केली आहे.

तानसाअभयारण्य इको सेन्सिटिव्ह झोन बाबत पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाने अधिसूचना घोषित केलेली आहे. तानसा अभयारण्य हे शहापूर, वाडा व मोखाडा तालुक्यातील 304.81चौरस किलोमीटर क्षेत्रावर स्थित आहे.

अधिसूचनेनुसार तानसा अभयारण्याभोवती शहापूर, भिवंडी, मोखाडा व वाडा चार तालुक्यातील मिळून एकूण क्षेत्र 475.160 चौरस किलोमीटर हे क्षेत्र पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित करण्याबाबत अधिसूचना जाहिर केलेली आहे.

सदर तानसा अभयारण्य भोवतालच्या पूर्व व दक्षिण सीमेलगत शहापूर तालुक्यातील प्रस्तावित वाढीव पर्यावरण सर्वेदनशील क्षेत्र इकोसेन्सेटिव्ह झोन स्थित आहे. एकूण 475.160 चौरस किलोमीटर क्षेत्रापैकी शहापूर तालुक्यातील 202.713 चौरस किलोमीटर म्हणजेच 20271.272 हेक्टर क्षेत्रापैकी 10250.977 हेक्टर हे क्षेत्र खाजगी क्षेत्र आहे.

तानसा अभयारण्याच्या पूर्वेकडील भागांमध्ये 1865सालापासूनच कल्याण कसारा मध्य रेल्वे तसेच मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग स्थित आहे. केंद्र शासनाने व राज्य शासनाने वेळोवेळी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करून राष्ट्रीय महामार्ग तसेच कल्याण कसारा रेल्वे विस्तारीकरण केलेले आहे.

दहागाव, वासिंद, खातिवली, वेहळोली, आसनगाव, शहापूर, चेरपोली, कांबारे, आवारे, पुणधे, आटगाव, कानविंदे, कळमगाव, लाहे, बिरवाडी, उंबरखांड, गोलभण, खर्डी, रातांधळे, शिरोळ, अजनूप, कसारा हा राज्य शासनाने औद्योगिकिकरणासाठी विकसित क्षेत्र जाहीर केलेले असून सन 1995 सालापासून या क्षेत्रावर शेकडो कारखाने उभारण्यात आले असून सर्व शासकीय परवानग्या घेऊन सदर क्षेत्रावर हे कारखाने उभारण्यात आले आहेत.

सदर कारखान्यांमध्ये गरीब, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी व आदिवासी बांधव यांना रोजगार मिळत आहे. तसेच प्रस्तावित इको सेन्सिटिव्ह झोनच्या लगत वरस्कोल-खर्डी महाराष्ट्र औद्योगिक वसाहत प्रस्तावित आहे. शहापूर तालुक्यातील प्रस्तावित इकोसेन्सेटिव्ह मधिल बहुतेक क्षेत्रातील जमिनींचा उपयोग या आधीच बिनशेती किंवा औद्योगिक वापरासाठी झालेला आहे.

सदर प्रस्तावित इकोसेन्सेटिव्ह ची सीमा निश्चित करताना बाधित शेतमालक, शेतकरी यांना कोणतीही सूचना न देता तसेच प्रत्यक्ष पाहणी न करता कागदोपत्री माहितीच्या आधारे तयार केलेला असून सदर अन्यायकारक इकोसेन्सेटिव्ह झोनमुळे आमचे जीवन नेस्तनाबूत होणार असल्याने आमचा विरोध असल्याचे इकोसेन्सेटिव्ह झोन संघर्ष समितीच्या विद्याताई खाडे यांनी सांगितले.

"शहापुरसह इतर ठिकाणी प्रस्तावित असलेल्या इकोसेन्सेटिव्ह झोनबाबत संबंधित केंद्रीय मंत्र्यांशी लवकरच चर्चा करून योग्य मार्ग काढण्याचा प्रयत्न करू.

"बाळ्यामामा उर्फ सुरेश म्हात्रे, खासदार, भिवंडी लोकसभा.

इको सेन्सिटिव्ह झोन संदर्भात पुढील कार्यवाही व विचार करण्यासाठी रविवार दि.14 जुलै 2024 रोजी सकाळी 10 वा जनकल्याण हायस्कूल सभागृह शहापूर येथे सभेचे आयोजन केले असून बाधित शेतकरी,कंपनी मालक, हॉटेल मालक, पेट्रोल पंप,निवासी संकुले यांच्या प्रतिनिधींनी आणि त्यातीलसभेला उपस्थित रहावे.

" ऍड. निखिल खाडे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com