अजूनही FASTag काढलेला नाही ? जाणून घ्या कसा मिळवाल फास्टॅग

सुमित बागुल
Saturday, 26 December 2020

देशभरातील टोल नाक्यांवर वेळ वाचविण्यासाठी फास्टॅग प्रणाली वर्षभरापूर्वीपासून बंधनकारक करण्यात आली होती.

मुंबई : देशभरातील टोल नाक्यांवर वेळ वाचविण्यासाठी फास्टॅग प्रणाली वर्षभरापूर्वीपासून बंधनकारक करण्यात आली होती. मात्र, एकाचवेळी एवढे फास्टॅग मिळविणे आणि त्या प्रणालीतील दोष पाहून सरकारने ही मुदत काहीवेळा वाढविली होती. आता १ जानेवारीपासून फास्टॅग बंधनकारक करण्यात आला आहे. अशात अनेकांना फास्ट टॅग कसा मिळवायचा याबाबत अजूनही माहिती नाही. या लेखाच्या माध्यमातून जाणून घ्या सोप्या पद्धतीने तुम्ही कसा मिळवू शकाल  फास्टॅग. 

महत्त्वाची बातमी : एकनाथ खडसेंना आली ED ची नोटीस ? यावर खडसेंची पहिली प्रतिक्रिया

FASTag म्हणजे काय ?  

फास्टॅग म्हणजे एक प्रकारचा विशेष बारकोड असून हा गाडीच्या पुढील काचेवर चिकटवायचा असतो. FASTag मध्ये रेडीओ फ्रिक्वेन्सी आयडेन्टीफिकेशन सिस्टम बसवलेली असते. हे टॅग स्टिकर काचेवर लावल्यानंतर तुम्हाला टोलनाक्यावरून जाताना टोल भरण्यासाठी तासंतास उभं राहून वेळ घालवायची गरज नाही. अनेकदा टोल काढताना पैशांचा वाद होतो, कधी सुट्टे पैसे मिळत नाही आणि यामुळे मोठ्या प्रमाणात टोल प्लाझावर रांगा पाहायला मिळतात. मात्र फास्टॅग लावल्यानंतर आपल्या बँकेच्या खात्यातून किंवा डिजिटल वॉलेटमधून टोलचे पैसे थेट कापले जातात. यामुळे टोलसाठी थांबण्याची गरज भासत नाही आणि आपला वेळ तसेच इंधन देखील वाचतं. 

महत्त्वाची बातमी : "मरतुकड्या अवस्थेतील विरोधी पक्ष, हे चित्र बरं नव्हे"; सामनातून संजय राऊतांचे काँग्रेसला चिमटे

कुठे मिळतो FASTag ? 

तुम्हाला तुमच्या जवळच्या नामांकित राष्ट्रीय बँकेत फास्टॅग मिळू शकेल. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), ICICI बँक, HDFC बँक, Axix बँक, कोटक महिंद्रा बँक या बँकांमध्ये फास्टॅग मिळू शकतो. यासोबतच  PayTM, Airtel पेमेंट बँक यासारख्या डिजिटल वॉलेट सुविधा देणाऱ्या मोबाईल ऍपवर  देखील Fastag उपलब्ध आहे. याशिवाय फास्टॅग ई-कॉमर्स वेबसाईट ऍमेझॉन, फ्लिपकार्टवर देखील मिळू शकतो किंवा तुम्ही जवळच्या पेट्रोल पंपावरवरून देखील तो मिळवू शकतात. फास्टॅग हे आपल्या बचत खात्याशी जोडलेले असल्याने आपले थेट बँकेच्या अकाऊंटमधून पैसे कापले जातात. 

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’च्या ‘इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन’च्या अंतर्गत FASTag ची कल्पना मांडण्यात आली आहे. 

महत्त्वाच्या लिंक्स : 

Fastag ची अधिकुत वेबसाईट 

PayTm  वरून  फास्टॅग मिळवण्यासाठी इथे क्लिक करा 

HDFC बँकेतून फास्टॅग मिळवण्यासाठी इथे क्लिक करा 

ICICI बँकेतून फास्टॅग मिळवण्यासाठी इथे क्लिक करा 

Axix बँकेतून फास्टॅग मिळवण्यासाठी इथे क्लिक करा 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा 

fastag mandatory from 1st january how to get fastag in easy three ways read full news


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fastag mandatory from 1st january how to get fastag in easy three ways read full news