Accident News: माळशेज घाटाजवळ भीषण अपघात; चार ठार, दोन जखमी

सर्व मृत जुन्नर तालुक्यातील, आवळ्याची वाडी जवळ अपघात
Accident News: माळशेज घाटाजवळ भिषण अपघात; चार ठार, दोन जखमी
Accident Newssakal

Otur News: माळशेज घाटा जवळील आवळ्याची वाडी (ता.मुरबाड जि.ठाणे) येथे नगर-कल्याण महामार्गावर दुधाचा ट्रँकर व ४०७ टेम्पो यांच्या झालेल्या अपघातात चार जण ठार झाले असून दोन जण जखमी झाले असल्याची माहिती टोकवडे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिनकर चकोर व पोलीस उपनिरीक्षक एकनाथ बदे यांनी दिली.

या अपघाता अक्षय शांताराम दिघे वय.३३ व तेजल अक्षय दिघे वय.२६ रा.पांगरी तर्फे मढ व टँकर चालक दत्तात्रय किसन वामन रा.पिपळवंडी हे जागीच ठार झाले असून ४०७ टेम्पो चालक शकील अमजत शेख रा.बादशाह तलाव,जुन्नर हा उपचारा दरम्यान मयत झाला आहे.

Accident News: माळशेज घाटाजवळ भिषण अपघात; चार ठार, दोन जखमी
Car Accident : कार अपघातात सहा ठार; मृतकांमध्ये आमदार सरनाईक यांच्या कुटुंबातील तिघांचा समावेश

सदर अपघाता आरूष अक्षय दिघे वय.३ हा जखमी असून आळेफाटा येथील खाजगी रूग्णालयात उपचार घेत आहे.या अपघाता बाबत निसार लतीफ पठाण यांनी टोकवडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.(pune Accident news)

याबाबत पोलीस हवालदार रमेश गंगावणे व पाडुरंग बगाड यांनी माहिती दिली की दिघे दामंपत्य नातेवाईकाच्या लग्न निमीत्त गावी आले होते ते शुक्रवारी दुपारी परत मुंबई ला दुधाच्या टँकर मध्ये माळशेज मार्गे कल्याण ला जात असताना कल्याण बाजू कडून जुन्नर बाजूला येत असलेल्या मालवाहू ४०७ टेम्पो ची नगर-कल्याण महामार्गावर आवळ्याची वाडी येथे समोरासमोर धडक झाली .

Accident News: माळशेज घाटाजवळ भिषण अपघात; चार ठार, दोन जखमी
Accidnet News: मासेमारी करणाऱ्या बोटीला मालवाहू जहाजाची धडक

ही धडक एवढी भिषण होती की या अपघाता टँकर रस्त्याच्या खाली होऊन टँकरवरील दुधाची टाकीही तुटून बाजूला झाली.तर मालवाहू पिकअप चे ही मोठे नुकसान झाले.या अपघातात दिघे दामंपत्य जागीच ठार झाले.तसेच टँकर चालक ही जागीच ठार झाला.

सुदैवानेशतकन वर्षाचा आरूष वाचला.तर ४०७ चा टेम्पो चालक ही गंभीर जखमी होऊन उपचारा दरम्यान मयत झाला.पुढिल तपास टोकवडे पोलीस करत आहे.

Accident News: माळशेज घाटाजवळ भिषण अपघात; चार ठार, दोन जखमी
Nashik Fire Accident : हिरावाडी रोडवर मोकळ्या भूखंडात ठेवलेल्या पाईपांना भीषण आग; वाहन जळून खाक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com