esakal | फादर स्टेन स्वामी यांच्या मृत्यूप्रकरणात होणार दंडाधिकारी चौकशी ?
sakal

बोलून बातमी शोधा

Father stan swamy

फादर स्टेन स्वामी यांच्या मृत्यूप्रकरणी दंडाधिकारी चौकशी ?

sakal_logo
By
अनिष पाटील

मुंबई : फादर स्टेन स्वामी (Father Stan Swamy Death) यांच्या मृत्यूप्रकरणी नियमानुसार लवकरच दंडाधिकारी चौकशी करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी सध्या अपघाती मृत्यूबाबतची (Accidental Death) कायदेशीर कार्यवाही ( Legal Action) सुरू असून त्यानंतर न्यायालयीन चौकशीच्या प्रक्रियेला सुरूवात करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले. स्टेन स्वामी यांचा मृत्यू झाला त्यावेळी ते न्यायालयीन कोठडीत (Court Custody) असल्यामुळे नियमानुसार याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया करण्यात येते. त्यानंतर याप्रकरणी दंडाधिकारी चौकशी करण्यात येईल. सीआरपीसी कलम 176(1)(अ) अंतर्गत ही कार्यवाही चालणार आहे. त्यात दंडाधिका-यां मार्फत निष्पक्ष चौकशी करण्यात येते. 2005 ही प्रक्रिया या कलमानुसार होते. 2010 मध्ये केंद्रीय मानवाधिकार आयोगाने (Human Rights) याबाबतचे आदेश दिले होते. त्यानुसार सर्वच मृत्यूंमध्ये न्यायालयीन चौकशी आवश्यक नव्हती. पण गेल्यावर्षी न्यायालयीन कोठडीत असताना मृ्त्यू झाला व त्याबाबत आरोप अथवा संशय असल्यास ही चौकशी करण्यात येते. (Father Stan Swamy Death Enquiry may be from Magistrate )

हेही वाचा: 'माझं गाव कोरोनामुक्त गाव' हे अभियान राबवा, मुख्यमंत्र्यांचे शिवसैनिकांना निर्देश

सामाजिक कार्यकर्ते स्टॅन स्वामी(84) यांचे सोमवारी दुपारी दीड वाजता निधन झाले. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात सहभागाचा स्टेन स्वामी यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. 9 ऑक्टोबर 2020 ला त्यांना रांची येथून अटक करण्यात आली होती. मुंबई ऊच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर 2 मे रोजी स्वामींना तळोजा मध्यवर्ती कारागृहातून खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. कोरोनामधून बरे झालेल्या स्वामींची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना मुंबईच्या होली फॅमिली रूग्णालयामध्ये व्हेंटिलेटरवर ठेवले होते. स्टेन स्वामी यांना तळोजा कारागृहातून मुंबईतील खासगी रुग्णालयात दोन आठवड्यांसाठी उपचाराकरिता दाखल करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला शुक्रवारी दिले होते. पण त्यांच्या जामिनाच्या अर्जाबाबत सुनावणी सुरू असतानाच त्यांच्या मृत्यूचे वृत्त आले होते. फादर स्टेन स्वामी यांना शनिवारी हृदयविकाराचा झटका आला. तळोजा रुग्णालयात असताना स्वामी यांना तीनदा रुग्णालयात दाखल करावे लागले होते.

loading image