esakal | 'माझं गाव कोरोनामुक्त गाव' हे अभियान राबवा, मुख्यमंत्र्यांचे शिवसैनिकांना निर्देश
sakal

बोलून बातमी शोधा

CM Uddhav Thackeray

युती-आघाडीची चिंता नको, घराघरांत पोहचा; उद्धव ठाकरेंचे आदेश

sakal_logo
By
- समीर सुर्वे

मुंबई : युती आघाडीची चिंता न करता जनतेची कामं (People work) करत राहा. माझं गाव , कोरोनामुक्त गाव या अभियानातून (coronafree village campaign) घरा घरात पोहचा. जनतेची माहिती घ्या त्यांच्या अडचणी समजून घ्या विकासाची कामे (Devlopement Work) त्यांच्या पर्यंत पोहचवा. असे आदेश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज शाखा प्रमुखांना दिले आहेत. कोविडमुक्त गाव अभियानातून पक्षबांधणीचे काम शिवसेना (Shivsena) करणार आहे. ( My village coronafree village campaign should be organised says CM Uddhav Thackeray to shivsena leaders)

ठाकरे यांनी आज राज्यभरातील शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांसह पदाधिकाऱ्यांशी ऑनलाईन संवाद साधला. सध्या राज्यात शिवसेनेच्या युती आघाडीची चर्चा सुरु आहे. यावरुन उध्दव ठाकरे म्हणाले,"युती आघाडीची चिंता न करता तुम्ही जनतेची कामे करा. विकासाची कामे जनते पर्यंत पोहोचवा. माझं गाव कोरोनामुक्त गाव हे अभियान राबवा. शाखा प्रमुखाने प्रत्येक घरात पोहोचायला हवे. लसीकरण झाले का नाही ,नसल्यास त्यांच्या अडचणी समजून घ्या. महापालिका,नगरपालिका ग्रामपंचायतीमध्ये जनतेसाठी कामे करा. आता आपण सत्तेत आहोत सत्तेत असताना तुम्ही शिवसेना पक्ष बळकट करण्यासाठी जनतेमध्ये जाऊन काम करायला हवे. असे निर्देशही त्यांनी दिले.

हेही वाचा: शुल्क भरले नाही म्हणून विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गात बसू न देणे अयोग्य - HC

शाखा प्रमुखांच्या खांद्यावर जबाबदारी

शिवसेना पक्ष आणि नागरिक यांच्यातील महत्वाचा दुवा शाखाप्रमुख मानला जातो. शाखांमधून शिवसेना वाढत गेली. पक्षातही शाखा प्रमुखाचा मान मोठा होता. मात्र,गेल्या काही वर्षात नवनवी पदे निर्माण झाली. असे असले तरी ठाकरे यांनी शाखा प्रमुखांवरच जबाबदारी टाकत विश्‍वास ठेवला आहे. येत्या काळात पक्ष बांधणीचे काम करण्याची महत्वाची जबाबदारी पुन्हा एकदा शाखा प्रमुखांवर सोपविण्यात आली आहे.

loading image