esakal | फादर स्टॅन स्वामी यांच्या मृत्यूची दंडाधिकारी चौकशी करण्यात येईल - HC
sakal

बोलून बातमी शोधा

Father stan swamy

फादर स्टॅन स्वामी यांच्या मृत्यूची दंडाधिकारी चौकशी करण्यात येईल - HC

sakal_logo
By
सुनिता महामुनकर

मुंबई : एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी फादर स्टॅन स्वामी (Father Stan Swamy) यांचा वैद्यकीय अहवाल (Medical Repot) राज्य सरकारने (state Government) आज मुंबई उच्च न्यायालयात ( Mumbai High Court) दाखल केला. स्वामी यांचे काही दिवसांपूर्वी खासगी रुग्णालयात निधन (Death) झाले आहे. दरम्यान स्वामी यांच्या मृत्यूची दंडाधिकारी चौकशी करण्यात येईल, असे खंडपीठाने स्पष्ट केले. ( Father Stan Swamy Death Enquiry will took place says Mumbai High Court)

चौऱ्यांशी वर्षी स्वामी तळोजा कारागृहात अटकेत होते. याच दरम्यान प्रक्रुती बिघडल्यामुळे त्यांना वांद्रेमधील होली फैमिली रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले होते. तळोजा कारागृह प्रशासनाने सुमारे तीनशे पानांचा वैद्यकीय अहवाल दाखल केला आहे. यामध्ये त्यांच्या अटकेपासूनची नोंदी आहेत असे प्रमुख सरकारी वकील अरुण पै यांनी सांगितले. रुग्णालयाच्या वतीने देखील वैद्यकीय अहवाल सादर करण्यात आला.

हेही वाचा: नशीला केक बनवणाऱ्यांच्या NCB ने आवळल्या मुसक्या, सायकोलॉजिस्टसह दोघे अटकेत

पार्किसन्ससह अनेक आजार स्वामी यांना होते. उच्च न्यायालयात त्यांनी जामीन मिळण्यासाठी याचिका केली होती. स्वामी कारागृहात न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झाल्यामुळे याबाबत आता फौजदारी दंडसंहिता 176 नुसार दंडाधिकारी चौकशी होईल, असे खंडपीठाने स्पष्ट केले. फौजदारी दंडसंहितेनुसार अशी चौकशी बंधनकारक असते. याबाबत पुढील सुनावणीला बाजू मांडण्याचे निर्देश न्यायालयाने सर्व पक्षकारांना दिले. याचिकेवर पुढील सुनावणी ता. 19 रोजी होणार आहे.

loading image