esakal | नशीला केक बनवणाऱ्यांच्या NCB ने आवळल्या मुसक्या, सायकोलॉजिस्टसह दोघे अटकेत
sakal

बोलून बातमी शोधा

drug cake

नशीला केक बनवणाऱ्यांच्या NCB ने आवळल्या मुसक्या, सायकोलॉजिस्टसह दोघे अटकेत

sakal_logo
By
अनिष पाटील

मुंबई : हशीशचा केक बनवून (Cake) `हश ब्राऊनी` नावाने विकणा-या साकोलॉजीस्टला (Psychologist) केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने( NCB) अटक केली. त्याच्या घरात त्याने बेकरी बनवली होती. त्यात तो ड्रग्स केक (Drug Cake) बनवत होता. या बेकरीतून 10 किलो ड्रग्स केक जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय घराच्या शोधमोहिमेत 320 ओपीएमसह पावणे दोन लाखांची रोखही (Money) जप्त करण्यात आली आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी ही कारवाई केली आहे. ( NCB Arrested psychologist and two person in Drug racket of cake bakery)

ड्रग्स बेकरी बाबत माहिती एनसीबीला मिळाली होती. या माहितीच्या आधारे सोमवारी माझगाव येथील आरोपीच्या ठिकाण्यावर छापा टाकून केकच्या स्वरूपात असलेलं सुमारे 10 किलो हशीस हे ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. तो ब्राउनी केकमध्ये हशीश व ओपीएम टाकून केक बनवायचा. आरोपी हश ब्राऊनी नावाने हा केक उच्चभ्रू पार्ट्या व ग्राहकांमध्ये विकत होता. आरोपी रहमीन चरानिया हा दक्षिण मुंबईतील एका प्रसिद्ध रुग्णालयात सायकोलॉजीस्ट म्हणून काम करायचा. रेनबो केक (चरस , गांजा आणि हशीस) हॅश ब्राऊनी(हशीश), पोर्ट ब्राऊनी( गांजा) असे विविध प्रकारचे नशीले केक आरोपी विकायचा. या माहितीच्या आधारे क्राफर्ड मार्केट परिसरातून रमजान शेख नावाच्या तस्कराला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 50 ग्रॅम हशीश जप्त करण्यात आले.

हेही वाचा: मंत्रिपद मिळवणं हा माझ्या राजकारणाचा पाया नाही- पंकजा मुंडे

आणखी एका कारवाईत नायजेरीयन तस्कराला अटक

एनसीबीने केलेल्या आणखी एका कारवाईत चुक्वू ईमेका ओगबोमा ऊर्फ मायकल या नायजेरीन नागरीकाला अटक केली. आरोपी कोकेन विक्रेत्यांच्या रॅकेटमधील आहे. आरोपी नालासोपारा व मुंबईतील इतर परिसरात कार्यरत होता. नायजेरीयामधील मुख्य तस्करांच्या सांगण्यावरून तो ड्रग्स वितरीत करत होता. आरोपीकडून उच्चप्रतिचे कोकेन जप्त करण्यात आले असून ते पेरू, ब्राझील व चिले या देशातून यायचे.

loading image