आंबेविक्रेत्यांना कारवाईची धास्ती; आर्थिक फटका बसण्याची शक्‍यता 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 एप्रिल 2018

तुर्भे : कृत्रिमरित्या आंबे पिकवून तो बाजारात लवकर दाखल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यापाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. त्याचा परिणाम विक्रीवर होत असल्याने व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. 

वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याची आवक वाढली आहे. हे आंबे इथेनॉलसह कार्बाईड नावाच्या विषारी रसायनांचा वापर करून कृत्रिमरित्या पिकवले जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आल्याने व्यापाऱ्यांमध्ये धास्ती वाढली आहे. 

कोकणाचा हापूस याचबरोबर जुन्नर, अलिबाग, उत्तरप्रदेश, बलसाड, कर्नाटक या ठिकाणांहून दर वर्षी दीड लाख आंब्यांच्या पेट्यांची दैनंदिन आवक विक्रीसाठी होते. ओखी वादळाचा फटका बसल्याने सागरी परिसरात व किनाऱ्याच्या आसपास पिकणाऱ्या आंब्याच्या मोहोरावर प्रतिकूल परिणाम झाल्याने सध्या आंब्याच्या 74 हजारांच्या आसपास पेट्या विक्रीसाठी येत आहेत. यातच चायनापुडी नावाखाली आंबा पिकविण्याच्या पद्धतीवर होणाऱ्या टीकेचा परिणाम आंबा विक्रीवर होत असल्याने याचा फटका सोसावा लागत असल्याची माहिती संजय पानसरे यांनी दिली. 

इथेनॉलला कृषी खात्याची परवानगी 
इथेनॉल वापरण्यास कृषी खात्याकडून मंजुरी दिली आहे. यासाठी आवश्‍यक प्रमाणदेखील निश्‍चित केले आहे. विशेष म्हणजे, बायर कंपनीला तशी मान्यता दिली आहे. अन्न औषध प्रशासन मात्र इथेनॉलच्या नावाखाली कारवाईचा फास आवळत आहे.

चांगल्या प्रतीचा हापूस दीड हजार रुपये पेटी या दराने विकला जात आहे. किमान दर 500 ते 700 रुपये पेटी एवढे आहे. वातावरणातील बदल आणि आंबा मोहोर काढतानाचा कालावधी यामुळे आंबा पिकण्यास वेळ लागत आहे; तसेच जागेची कमतरता यामुळे आंबा पिकविण्यास अडचण येत आहे. 

आंबा दर 
किमान दर 500 ते 700 रुपये पेटी 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: FDA to act against traders who are using harmful chemicals on mangoes