FDA Action: भिवंडीत दीड कोटींच्या अन्नसाठ्यावर कारवाई, राज्यभरात १४ आस्थापनांवर बडगा

FDA Crack Down: भिवंडीत अन्न व औषध प्रशासनाने दीड कोटी रुपयांच्या अन्नसाठ्यावर मोठी कारवाई केली आहे. यासोबतच राज्यभरातील १४ आस्थापनांवरही प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.
Maharashtra FDA action

Maharashtra FDA action

esakal

Updated on: 

मुंबई : अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत आणि स्वच्छतेच्या नियमांबाबत राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या तपासणीत भिवंडी येथे एक कोटी ५३ लाख रुपयांचा अन्नसाठा जप्त करण्यात आला, तर राज्यातील १४ अन्न आस्थापनांचे परवाने किंवा कामकाज निलंबित करण्यात आले आहे. प्रतिबंधित अन्नपदार्थांची वाहतूक करणारे वाहनही जप्त करण्यात आले. तसेच दोन गुन्हे दाखल करून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

Loading content, please wait...