

FDA Action In Diwali
ESakal
मुंबई : दिवाळी सणादरम्यान खाद्यपदार्थांमधील भेसळ आणि अस्वच्छ वातावरणात अन्नपदार्थांची विक्री रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने ४ आणि ५ नोव्हेंबर रोजी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात विशेष तपासणी मोहीम राबवली. या दोन दिवसांच्या कारवाईत मुंबईतील २८ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित केले, तर बोरिवली येथील राजधानी बिर्याणी केंद्राचा व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिल. संपूर्ण राज्यात १०५ परवाने निलंबित करण्यात आले असून, सात खाद्य आस्थापनांचा व्यवसाय बंद करण्यात आला.