FDA : अॅमेझॉन व फ्लिपकार्टला बजावली नोटीस, जाणून घ्या प्रकरण

amazon and flipkart
amazon and flipkartsakal media

मुंबई : गर्भपातासाठी (Abortion) वापरात येणाऱ्या औषधाची (मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेगन्सी किट) ऑनलाईन विक्री (online sailing) होत असल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र  राज्य यांच्यावतीने तपासणीसाठी विशेष मोहिम राबवण्यात आली. प्रशासनाने एकूण 34 ऑनलाईन संकेतस्थळावर (Websites) गर्भपातासाठी लागणाऱ्या औषधांच्या (Medicines)उपलब्धतेबाबत पडताळणी केली. ( fda gives notice to amazon and flipkart for prescription information of abortion-nss91)

 त्यानुसार अॅमेझॉन या संकेतस्थळावर प्रशासनातील अधिकाऱ्यांनी ग्राहक म्हणून मागणी नोंदवली. त्यानुसार डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय गर्भपाताच्या औषधाची मागणी दोन वेळा अॅमेझॉनवर स्विकारून त्याची गुरुनानक इंटरप्राइजेस, लखनऊ, उत्तर प्रदेश व चौधरी फार्मास्युटिकल्स /पिरामल लि., कोरापूर, ओरिसा या संस्थेकडून औषधे पुरवण्यात आले. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय एमटीपी किट औषधाची ऑनलाईन विक्री करणे हे औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 मधील तरतुदींचे उल्लंघन आहे. प्रशासनाने अॅमेझॉन व संबंधित वितरक यांना यासंदर्भात नोटीस बजावली असून पुढील कारवाई करण्यात येत आहे.

amazon and flipkart
पूरग्रस्तांसाठी सारस्वत बँकेकडून 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'ला मदत

दुसऱ्या एका प्रकरणात फ्लिपकार्ट या ऑनलाईन संकेतस्थळावर गर्भपातासाठी लागणाऱ्या औषधाची मागणी नोंदवली असता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची मागणी न करता फ्लिपकार्टच्या संकेतस्थळावर दोनवेळा औषधाची मागणी स्विकारण्यात आली व ते पुरवण्यात येणार असल्याचे देखिल संकेतस्थळावरुन एसएमएस संदेशद्वारे कळवण्यात आले. वास्तविक गर्भपातासाठी वापरात येणाऱ्या औषधांची डॉक्टर प्रिस्क्रिप्शनशिवाय विक्रीस होकार दर्शवणे, हे देखिल कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करणारे असल्याने फ्लिपकार्ट या कंपनीस नोटीस बजावण्यात आली असून पुढील कारवाई करण्यात येत आहे.

नुकतेच पुणे येथे अॅमेझॉन या संकेतस्थळावरुन एमटीपी किटची विक्री पुण्यातील औषध विक्रेत्यास केल्याने औषध विक्रेत्याने पुणे येथील अन्न व औषध प्रशासन कार्यालयास तकार दाखल केली होती. या तक्रारी अनुषंगाने प्रशासनाने तातडीने कारवाई करुन यामध्ये सामील असलेला पुरवठादार, मे. आर. के. मेडिकल, अहमदाबाद, गुजरात यांचेकडे प्रत्यक्ष जावून चौकशी केली. या वितरकाकडे औषधाचे खरेदी बिल नसल्याचे उडकीस आले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून संबंधिताविरुध्द पुणे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील कारवाई करण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com