

Tukaram Mundhe
esakal
मुंबई : अन्न भेसळीविरोधातील कारवाया तीव्र होत असताना तपासणी यंत्रणेवर अपुऱ्या मनुष्यबळामुळे ताण वाढला आहे. मुंबईतील अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) प्रयोगशाळेत दररोज सरासरी ५० ते ५५ अन्न नमुने तपासणीसाठी येत आहेत. प्रयोगशाळेची महिन्याला सुमारे अडीच ते तीन हजार नमुने तपासण्याची क्षमता आहे, मात्र वाढत्या अन्न व्यवसायांच्या तुलनेत अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांची संख्या अपुरी असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.