
मुंबई : गणेशोत्सवाच्या निमित्ताने सुरू होणाऱ्या सणासुदीच्या काळात मिठाई, खवा, तूप, दूध, फरसाण, सुका मेवा, खाद्यतेल, बेसन आदी पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. या वाढीव मागणीचा गैरफायदा घेत भेसळीचे प्रमाणही वाढते. याच पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन (एफडीए) राज्यभर तपासणी मोहीम राबवत असून, मिठाई, प्रसाद व खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर करडी नजर ठेवण्यात आली आहे.