
ठाणे : गणेशोत्सव असो या नवरात्र आणि त्यानंतर येणाऱ्या दिवाळी यासारख्या सणांच्या काळात विविध प्रकारच्या अन्नपदार्थांच्या मागणीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. विशेषतः मिठाईच्या खरेदीसाठी दुकानांमध्ये नागरिकांची गर्दी उसळते. याचाच गैरफायदा घेऊन विक्रेत्यांकडून कमी दर्जाचे, शिळे, भेसळयुक्त अन्न पदार्थांची विक्री होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकतात. त्यामुळे दरवर्षी एफडीएकडून आस्थापनांची तपासणी करण्यावर अधिक भर दिला जातो.