
मुंबई, १६ : माझगाव येथील दारूखाना येथे अन्न व औषध प्रशासन विभागाने मंगळवारी धडक कारवाई करत तब्बल साडे तीन लाखांचा खाद्यतेलाचा साठा जप्त केला. सात कंपन्यांचे तेल या दुकानातून जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या खाद्यतेलाचे नमूने विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहे.
मुंबईतील दारूखाना येथील शिव टेड्रर्स या दुकानामध्ये कमी दर्जाचे खाद्यतेलाचा साठा केल्याचे तसेच खाद्यतेल भरण्यासाठी जुन्या डब्यांच्या पुनर्वापर करण्यात असल्याची माहिती एफडीएला मिळाली होती. त्यानुसार एफडीएने १५ डिसेंबरला शिव टेड्रर्सवर छापा घातला. या छाप्यामध्ये इम्पोर्टेड आरबीडी पामोलिन ऑईल, रॉयल कंपनीचे मस्टर्ड एक्सप्लेर ऑईल, राधा कृष्णा कंपनीचे रिफाईन्ड राईस ब्रान ऑईल, सच्चा हिरा कंपनीचे शेंगदाणा तेल, सरगम कंपनीचे शेंगदाणा तेल, बन्सीवाला कंपनीचे मस्टर्ड एक्सप्लेर तेल त्याचप्रमाणे सुट्ट्या स्वरुपात आर.बीडी. पामोलिन तेल जप्त करण्यात आला.
जप्त केलेल्या तेलाचे वजन ३९८८.८ किलोग्रॅम इतक्या वजनाचे असून, त्याची किंमत ३ लाख ५५ हजार ९३५ रुपये इतकी आहे. जप्त केलेल्या तेलाच्या साठ्यातून काही नमूने विश्लेषणासाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती सह आयुक्त (अन्न) शशिकांत केंकरे यांनी दिली.
सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील येड्रावकर यांच्या सूचनेनुसार एफडीएचे आयुक्त अभिमन्यू काळे आणि सहाय्यक आयुक्त वि.द.मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी लक्ष्मीकांत सावळे, अरुण धुळे, रवींद्र जेकटे, संतोष सावंत आणि भांडवलकर यांनी ही कारवाई केली. आपल्या परिसरामध्ये भेसळयुक्त खाद्यपदार्थांची साठवणूक होत असल्याचे प्रकार आढळून आल्यास त्यासदंर्भातील माहिती एफडीएच्या १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर देण्यात यावी, असे आवाहन एफडीए आयुक्त अभिमन्यू काळे यांनी केले आहे.
( संपादन - सुमित बागुल )
fda raids in oil shops and seized eatable oild worth three and half lac rupees
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.