FDA Action: मुंबईत 'झेप्टो'च्या गोदामासह १० हॉटेलांचे परवाने निलंबित, आठ अन्न व्यावसायिकांना नोटिसा
FDA Action in Mumbai: मुंबईत अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. झेप्टोच्या गोदामासह १० हॉटेलांचे परवाने निलंबित करण्यात आले असून, आठ अन्न व्यावसायिकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) २४ ते २६ नोव्हेंबरदरम्यान मुंबईत राबवलेल्या विशेष तपासणी मोहिमेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कडक कारवाई केली आहे.