निसर्गरम्य काशिदमध्ये याची आहे दहशत

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 4 February 2020

सर्वे येथील अनंत कदम यांच्या घराच्या शेजारी असलेल्या गोठ्यात गाय बांधलेली होती. तिच्यावर मध्यरात्री बिबट्याने हल्ला केला. त्यानंतर गोठ्यातून फरफटत काही अंतरावर नेऊन मोकळ्या जागेत तिचा फडशा पाडला. 

मुरूड : काशिद जवळच्या सर्वे गावात काल बिबट्याच्या हल्ल्यात गायीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. हा गाव फणसाड अभयारण्याच्या हद्दीत असून बिबट्यांची संख्या वाढल्याने आणि सहज शिकार मिळत नसल्याने बिबटे मानवीवस्तीत घुसण्याच्या घटना वाढल्या आहेत. 

सर्वे येथील अनंत कदम यांच्या घराच्या शेजारी असलेल्या गोठ्यात गाय बांधलेली होती. तिच्यावर मध्यरात्री बिबट्याने हल्ला केला. त्यानंतर गोठ्यातून फरफटत काही अंतरावर नेऊन मोकळ्या जागेत तिचा फडशा पाडला. 

हे वाचा : तणावाची कारणे काय आहेत?

ही घटना प्रादेशिक वन विभाग हद्दीत घडल्याने वनक्षेत्रपाल प्रशांत पाटील यांनी तातडीने सहकाऱ्यांसोबत घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर घटनेचा पंचनामा केला. कदम यांना नुकसानभरपाई मिळावी यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून शवविच्छेदन अहवाल घेतला आहे. 

उपयुक्त बातमी : सेंद्रीय भाजी का फायदेशीर

याबाबत पशुधन पर्यवेक्षक अधिकारी विनायक पवार यांनी सांगितले की, बिबट्याने गाईवर हल्ला केला आहे. शवविच्छेदन अहवाल वनखात्याला आणि संबंधितांना दिल्याने 
स्थानिक शेतकऱ्याला सरकारकडून मदत मिळेल. 

वन्यजीवांपासून कोणताही हल्ला पाळीव प्राण्यावर झाल्यास ग्रामस्थांनी फणसाड अभयारण्याशी संपर्क साधावा. सर्वे येतील शेतकऱ्याला नुकसानभरपाई मिळेल. 
- राजवर्धन भोसले, वनपरिक्षेत्र अधिकारी, फणसाड अभयारण्य.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fear caused by leopard in Kashid