
मुंबई : कबुतरांच्या विष्ठेमुळे आणि पिसांमुळे नागरिकांना धोका निर्माण होत असल्यामुळे काही महिन्यांपूर्वी कबुतरांना खाद्य देण्यासंबंधी कडक निर्बंध दिले होते. तसेच कबुतरांना खायला देणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असेही सांगण्यात आले होते. मात्र त्यानंतरही नागरिक कबुतरांना खाऊ देत असल्याचे दिसत असून, सरकारने शहरात कबुतरांना खाद्य देणे तात्काळ बंद करण्याचे निर्देश बीएमसीला दिले आहेत