esakal | लढा कोरोनाशी : पोलिस फक्त फटकेच देत नाहीत, हे पाहा खाकी वर्दीतील देवदूत...
sakal

बोलून बातमी शोधा

लढा कोरोनाशी : पोलिस फक्त फटकेच देत नाहीत, हे पाहा खाकी वर्दीतील देवदूत...

देशभरातील लॉकडाऊनमुळे शेकडो गरीब, निराधार आणि रोजंदारीवर काम करणाऱ्यांची गैरसोय होतेय. छोट्या मोठ्या खानावळी, हॉटेल यावर हे नागरिक अवलंबून असायचे. मात्र आता सर्वच बंद असल्याने त्यांच्या जेवणाचा प्रश्न निर्माण होतोय.

लढा कोरोनाशी : पोलिस फक्त फटकेच देत नाहीत, हे पाहा खाकी वर्दीतील देवदूत...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - कोरोनामुळे जगभरात थैमान घातलंय . अशात देशभरात २१ दिवसांचं लॉकडाऊन जारी करण्यात आलंय. आपण जिथे आहात तिथेच राहण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. आपण घरातंच राहावं, घराबाहेर पडू नये यासाठी राज्य सरकारकडून देखील वारंवार सांगण्यात येतंय. महाराष्ट्र पोलिस स्वतःच्या जीव तळहातावर घेऊन २४ तास ड्युटी करताना पाहायला मिळतायत. रस्त्यावरून विनाकारण ये जा करणाऱ्यांना फटक्यांचा प्रसाद देखील देताना पाहायला मिळतायत. अशात आता आपली काळजी घेणाऱ्या पोलिसांची दुसरी बाजू समोर आलीये. 

मोठी बातमी - कोरोनाचे साईड-इफेक्ट्स : ओळखीच्या महिलेसाठी गेट उघडलं नाही म्हणून सेक्रेटरीला मारहाण

देशभरातील लॉकडाऊनमुळे शेकडो गरीब, निराधार आणि रोजंदारीवर काम करणाऱ्यांची गैरसोय होतेय. छोट्या मोठ्या खानावळी, हॉटेल यावर हे नागरिक अवलंबून असायचे. मात्र आता सर्वच बंद असल्याने त्यांच्या जेवणाचा प्रश्न निर्माण होतोय. अशात मदतीला कल्याण मधील वाहतूक पोलिस धावून आलेत. काल रात्री म्हणजेच 25 मार्च रोजी रात्री वाहतूक पोलिसांनी कल्याण रेल्वे स्टेशन सहित शहरात गरिबांना अन्न वाटप केले. त्यामुळे खाकी वर्दीमधील माणुसकीची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे . 

लॉकडाऊन मध्ये गरीब निराधार आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या नागरिकांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून कल्याण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील आणि त्यांच्या पथकाने हे मदतकार्य राबवलं. आपल्या स्वखर्चाने कल्याण वाहतूक विभाग सहायक आयुक्त दत्तात्रय निघोट, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुखदेव पाटील आणि त्यांच्या पथकाने गरीब आणि निराधार नागरिकांना अन्न वाटप आणि पिण्याच्या पाण्याचं मोफत वाटप केलंय. 

मोठी बातमी -  लष्कराच्या मदतीची वेळ येऊ देऊ नका : उपमुख्यमंत्री अजित पवार

त्यामुळे वाहतूक पोलिसांनी केलेल्या या मदतीमुळे वर्दीतील देवदूत तर महाराष्ट्राने आता पहिलेच आणि या पोलिसांचं सर्वच स्तरातून कौतुकही होतंय.

लढा कोरोनाशी  

fight against corona kalyan traffic police commissionaire distributes water and food to needy people

loading image