esakal | कोरोनाचे साईड-इफेक्ट्स : ओळखीच्या महिलेसाठी गेट उघडलं नाही म्हणून सेक्रेटरीला मारहाण
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाचे साईड-इफेक्ट्स : ओळखीच्या महिलेसाठी गेट उघडलं नाही म्हणून सेक्रेटरीला मारहाण

"ही महिला माझी नातेवाईक आहे आणि तिला काही जीवनावश्यक सामानाची गरज होती म्हणून तिला मी आतमध्ये बोलवत होती."

कोरोनाचे साईड-इफेक्ट्स : ओळखीच्या महिलेसाठी गेट उघडलं नाही म्हणून सेक्रेटरीला मारहाण

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : भारतात कोरोना व्हायरसचं प्रमाण वाढत चाललं आहे. देशात कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल ६०० च्या वर पोहोचली आहे. अमेरिका,इटली यासारख्या देशांमध्ये दररोज हजारो लोकांना कोरोनाची लागण होत आहे. त्यामुळे भारतात  लोकांमध्ये कोरोनाची दहशत वाढत चालली आहे. याच दहशतीमुळे मुंबईत एका सोसायटीच्या सेक्रेटरीला मारहाण केल्याची घटना घडली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १५ एप्रिलपर्यंत संपूर्ण देश लॉकडाउन राहील अशी घोषणा केली होती. त्याच पार्श्वभूमीवर सर्व सोसायटीच्या सेक्रेटरींना कोणत्याही अनोळखी व्यक्तीला सोसायटीत प्रवेश द्यायचा नाही असे निर्देश देण्यात आले होते. मात्र याच गोष्टीमुळे एका महिलेनं तिच्या सोसायटीच्या सेक्रेटरीला मारहाण केल्याची घटना घडली आहे. 

मोठी बातमी मुंबई मागोमाग आता नवी मुंबईतही कोरोनाचा बळी, म्हणून वारंवार सांगितलं जातंय घरीच राहा !

नक्की काय आहे प्रकरण:

अंधेरीतल्या तारापोर टॉवर्स या सोसायटीचे सेक्रेटरी राकेश सेल्हो यांनी सीमा सिंग नावाच्या महिलेच्या ओळखीच्या व्यक्तीला सोसायटीच्या आतमध्ये येऊ दिलं नाही म्हणून या महिलेनं त्यांना मारहाण केली. 

"सकाळी १० वाजताच्या सुमारास मी जेव्हा दाराजवळ सुरक्षेची पाहणी करण्यासाठी आलो तेव्हा मला एक महिला गेटजवळ उभी दिसली. मी विचारपुस केली असता ही महिला कोणाची तरी वाट बघत होती. मात्र गेट बंद असल्यामुळे ती आत येऊ शकत नव्हती. त्यामुळे ती सोसायटीच्या दुसऱ्या गेटजवळ पोहोचली. त्यावेळी तिथं सीमा सिंग आल्या आणि या महिलेला आतमध्ये नेण्याचा प्रयत्न करू लागल्या. मात्र मी त्यांना विरोध केल्यावर त्यांनी मला मारहाण केली", असा आरोप सेक्रेटरीनं केला आहे. 

मोठी बातमी  - ठाणे, नवी मुंबईत तीन कोरोना चाचणी केंद्र सुरु होणार

दरम्यान "ही महिला माझी नातेवाईक आहे आणि तिला काही जीवनावश्यक सामानाची गरज होती म्हणून तिला मी आतमध्ये बोलवत होती. मात्र सोसायटीच्या सेक्रेटरीनं मला धक्काबुक्की केली. त्यामुळे मी त्यांना मारहाण केली," असं या महिलेचं म्हणणं आहे.
पोलिसांनी या दोघांनाही भांडण न करण्याचं आणि शांत राहून एकमेकांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे.

women beats society secretory for not letting in the known person due to corona

loading image
go to top