मुंबईच्या दाट लोकवस्तीत राहणारी महिला कोरोनामुक्त; परिसरदेखील आहे कोरोना निगेटिव्ह

मुंबईच्या दाट लोकवस्तीत राहणारी महिला कोरोनामुक्त; परिसरदेखील आहे कोरोना निगेटिव्ह

मुंबई : घाटकोपर येथील झोपडपट्टीत राहाणारी महिला कोरोनातून पुर्ण पणे बरी झाली आहे. त्याच बरोबर महानगर पालिकेने केलेल्या तपासणीत या परीसरात एकही रुग्ण सापडलेला नाही.मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून आज या संपुर्ण परीसराचे निर्जतूंकीकरण करण्यात आले आहे.

घाटकोपर येथे अमेरीकेवर आलेल्या महिलेच्या संपर्कात आल्याने तीच्या घरी काम करणाऱ्या 68 वर्षिय महिलेला कोरोनाची बाधा झाली होती.ही महिला झोपटपट्टीत राहात असल्याने पालिकेपुढे मोठे आव्हान उभे ठाकले होते. या महिला इतर तीन घरात काम करत होती. त्यातील दोन घरातील कुटूंबाना आवश्‍यक काळजी घेण्यास सांगण्यता आले आहे.त्याच बरोबर काहींची चाचणीही करण्यात आली होती. तसेच, या महिलेच्या मुलाचीही चाचणी करण्यात आली होती. अशा नऊ जणांची चाचणी करण्यात आली होती. या सर्वांची चाचणी नकारात्मक आली आहे. 17 मार्च रोजी या महिलेला कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता या महिलेच्या सलग दोन चाचण्या नकारात्म आल्या असून ती कोरोनातून बरी झाली असल्याचे निश्‍चित झाले आहे. असे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

सध्या या परीसरात सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणं दिसत नाही. मात्र, या परीसरातील नागरीकांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे असे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. कोरोनाची बाधा झाल्यानंतर 14 दिवसात आजाराची लक्षणं दिसू शकतात. मात्र, दाटीवाटीने उभ्या असलेल्या झोपडपट्टीत कोरोनाचा प्रसार झाल्यास त्यावर नियंत्रण मिळवणे अवघड आहे. सध्या तरी या परीसरात कोणताही धोका नाही. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून महानगर पालिकेने आज हा परीसर पुर्ण पणे सॅनिटाईज केला आहे.

हा परीसर सॅनिटाईज करण्यासाठी अग्निशमन दलाच्या बंबांचा वापर केला जात आहे. त्यात पाण्या बरोबर सोडियम हायड्रोक्‍लोराईड रसायन वापरण्यात येत आहे. या रसायनामुळे संपुर्ण परीसराचे निर्जंतूकीकरण केले जात असल्याचे अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
fight against covid 19 women from ghatkopar slums recovered from corona

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com