COVID19 : कोरोनाबाबत नसत्या अफवा पसरावणाऱ्यांच्या तोंडावर मारा 'ही' बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

COVID19 : कोरोनाबाबत नसत्या अफवा पसरावणाऱ्यांच्या तोंडावर मारा 'ही' बातमी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अफवांचं पीक 

COVID19 : कोरोनाबाबत नसत्या अफवा पसरावणाऱ्यांच्या तोंडावर मारा 'ही' बातमी

मुंबई - जगभरात कोरोनाने थैमान घातलंय. चीन नंतर इटली, इराण स्पेन, युरोप आणि अमेरिकेत मोठा फटका बसलाय. अशात महाराष्ट्रात कोरोना अजूनही कंट्रोलमध्ये असल्याच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सार्वजनिक आरोग्य मंत्रो राजेश टोपे यांनी सांगितलंय. खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारकडून अनेक मोठे निर्णय सुद्धा घेण्यात आलेत. यामध्ये मुंबईतील लोकल ट्रेन बंद करण्याचा निर्णय, महाराष्ट्रात कलम १४४ म्हणजे जमावबंदी लागू करणे, महाराष्ट्रात लॉकडाऊन जारी करणे, राज्यांतर्गत जिल्ह्या-जिल्ह्यांच्या सीमा बंद करणे, असे अनेक मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. 

मोठी बातमी - मुंबईतून आली कोरोनासंदर्भात अत्यंत दिलासादायक बातमी

दरम्यान या निर्णयांच्या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये आपल्या आसपासची भाजीची, दुधाची किंवा दैनंदिन जीवनात लागणाऱ्या औषधांची दुकानं सुरु राहणार की नाहीत याबाबत मोठा संभ्रम निर्माण झालाय झालाय. म्हणून मोट्या प्रमाणात नागरिक बाजारात देखील जात असल्याचं आपल्याला समजतंय. याला कारण ठरलाय सोशल मीडिया. सोशल मीडियाच्या माध्यमातून, WhatsApp किंवा फेसबुक च्या माध्यमातून नको ते मेसेजेस व्हायरल केले जातायत. असाच एक मेसेज सध्या मुंबईत आणि उपनगरात मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

काय आहे हा मेसेज :- 

Dates  & timings for distributions of :
(1) MILK - From Morning 6 a.m to 8 a.m.(daily)
(2) NEWS PAPERS - Upto 7 a.m (daily(
(3) VEGETABLES, KIRANA &  MEDICAL SHOPS : From Morning 8 a.m. to 11 a.m. ( on 24/26/28 & 30 March only)
By Order of Mumbai Police Commissioner

व्हायरल मेसेजमध्ये दुधाची दुकाने दुकाने सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत, वर्तमानपत्र सकाळी ७ पर्यंतच, भाजीपाला, किराणा आणि मेडिकल स्टोअर्स  सकाळी 8 ते दुपारी 11 पर्यंत खुले राहतील असं सांगण्यात आलाय. धक्कादायक बाब म्हणजे ही दुकानं एक दिवसाआड म्हणजेच २४ , २६, २८ आणि ३० मार्च रोजी ही दुकानं सुरु राहणार असल्याचं मेसेजमध्ये सांगितलं गेलंय. मुंबईतील पोलिस आयुक्तांनी हे निर्देश दिल्याचं देखील सांगितलं जातंय. मात्र हा मेसेज पूर्णपणे खोटा असल्याचं आता समोर आलंय 

मोठी बातमी - कोरोनाच्य पार्श्वभूमीवर मुंबई पोलिस आयुक्त ऑन फिल्ड

स्वतः मुंबई पोलिसांकडून याबाबत खुलासा करण्यात आलाय. अफवा या कोरोनाव्हायरसपेक्षा जास्त धोकादायक आहेत म्हणत ही यादी फेक म्हणजेच खोटी असल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलंय. मुंबई पोलिसांकडून असे कोणतेही निर्देश देण्यात आले नसल्याचं देखील मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे. 

mumbai police clarifies on the fake message being spread about corona and shop timings