मोठी बातमी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कैद्यांच्या सुटकेची प्रक्रिया सुरू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 मार्च 2020

राज्यभरात अडीचशेहून अधिक अर्ज... 

मुंबई : कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर कच्च्या कैद्यांना अंतरिम जामीन देण्याबाबत राज्यभरातील कनिष्ठ न्यायालयांमध्ये कार्यवाही सुरू झाली आहे. सुटकेसाठी कैदी तसेच त्यांच्या वकिलांकडून अडीचशेहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. 

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार कच्चे कैदी ज्यांचे खटले अद्याप सुरू झालेले नाहीत, अशांना जामिनावर सोडण्यात येणार आहे. यासाठी दंडाधिकारी न्यायालयाने पात्र कैद्यांना सोडण्याचे निर्देशही कनिष्ठ न्यायालयांना दिले आहेत. त्यानुसार मुंबईतील न्यायालयात शंभरहून अधिक जणांच्या सुटकेची प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अनेक न्यायालयांनी स्यू मोटो कार्यवाही सुरू केली आहे; मात्र गंभीर गुन्हा असलेल्या आरोपींना यामधून वगळले आहे. तसेच परदेशी आणि राज्याबाहेरील कैद्यांना हा निर्णय लागू नाही. 

मोठी बातमी -  "होय, आपण कोरोनाच्या स्टेज ३ मध्ये आहोत. ही स्टेज ३ ची सुरवात आहे"

मुंबईतील अनेक न्यायालयांत काम करणाऱ्या वकिलांना ओळखपत्र असूनही पोलिसांकडून प्रवेश दिला जात नाही, अशा तक्रारी वकिलांनी वकील संघटनेकडे केल्या आहेत. आरोपींना जामीन व अन्य कारणांमुळे न्यायालयात दाद मागावी लागते. अशा स्थितीत वकिलांना अडविल्यामुळे कैद्यांच्या जगण्याच्या अधिकारात बाधा येऊ शकते. त्यामुळे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाने पोलिस महासंचालकांना निवेदन द्यावे, अशी मागणी वकिलांनी केली आहे.  

to fight against novel corona virus parole process to release prisoners starts


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: to fight against novel corona virus parole process to release prisoners starts