बाळासाहेब ठाकरे कुणाचे? 'शिवसेना-मनसे'त बाळासाहेबांवरून वादंग..

बाळासाहेब ठाकरे कुणाचे? 'शिवसेना-मनसे'त बाळासाहेबांवरून वादंग..

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपला झेंडा बदलत हिंदुत्वाची भूमिका स्वीकारल्यानंतर आता अधिकृतपणे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरण्यास सुरुवात केली आहे. असे करण्यास शिवसेनेकडून आक्षेप घेतला गेल्याने या प्रकरणावर पुन्हा वाद निर्माण होण्याची दाट शक्‍यता आहे. या प्रकरणी शिवसेनेने गांभीर्याने पावले उचलण्यास सुरुवात केली असून शिवसेनेकडून याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 

मुंबईच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भगवा झेंडा आणि हिंदुत्वाचा अजेंडा घेतल्यानंतर आता मनसैनिकांनी राज ठाकरे यांना हिंदुरुदयसम्राट उपाधी दिली आहे. समाजमाध्यमांवर राज ठाकरे यांच्यासह शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे फोटो वापरून मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत. शिवसेनेकडून यासाठी आक्षेप घेतला आहे.

बाळासाहेब ठाकरे यांनी राज ठाकरे यांना शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर माझा फोटो तुझ्या मंचावर वापरू नको अशी सक्त ताकीद दिली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी बाळासाहेबांचा फोटो मनसेच्या मंचावर आणि कार्यक्रमात वापरला नव्हता. पण आता राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा अजेंडा घेतल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो विविध पोस्टमध्ये जाणीवपूर्वक वापरला जात असल्याचा आरोप शिवसैनिक करत आहेत. यावरून मनसैनिक आणि शिवसैनिकांमध्ये समाजमाध्यमांवर टीकाटिपणी होऊ लागली आहे. 

शिवसेनेने बाळासाहेबांच्या समाजमाध्यमांवरील मोहीमेला विरोध केला आहे.बाळासाहेब हे शिवसेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत.शिवसेना हा त्यांचा नोंदणीकृत पक्ष आहे.त्यांची प्रतिमा इतर कोणताही पक्ष आपल्या फलकांवर किंवा झेंड्यावर वापरू शकत नाही अशी शिवसेनेची भूमिका आहे. अस असून देखील मनसेकडून बाळासाहेबांच्या प्रतिमेचा वापर होत असल्याने त्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याच्या हालचाली शिवसेनेकडून सुरू आहेत. 

बाळासाहेबांना दैवत संबोधणारे त्यांना सोडून का गेले.सोडून गेल्यानंतर त्यांना आता त्यांच्या प्रतिमेची गरज का पडली.मनसेच हे बेरकी प्रेम आहे.याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून कायदेशीर कारवाईचा विचार देखील करू. - मनीषा कायंदे , आमदार , शिवसेना 

मनसे स्थापन झाल्यापासून राजकारणासाठी आम्ही कधीही बाळासाहेबांची प्रतिमा वापरलेली नाही.कुणी पदाधिकारी समाजमाध्यमांमध्ये बाळासाहेबांच्या प्रतिमेचा वापर करत असेल तर त्याबद्दल मला माहित नाही.याबाबत माहिती घेतली जाईल. - अविनाश अभ्यंकर , नेते , मनसे 

fight between MNS and Shivsena over use of balasaheb thackerays photo on political stage

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com