
Maharashtra Rains: BMCच्या पार्किंगमधील वाहने गेली होती पाण्याखाली
Maharashtra Rains मुंबई: राज्यात मुसळधार पावसाने हाहा:कार माजवला आहे. मुंबईलाही पावसाने झोडपले. अतिवृष्टीमुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. सर्वत्र जनजीवन विस्कळीत झालं. मागच्या आठवड्यात शनिवारी रात्री कोसळलेल्या जोरदार पावसामुळे मुंबईच्या शहर अनेक ठिकाणी पाणी भरलं. BMCच्या 'अंडरग्राऊंड' पार्किंगमधील मुंबईकरांची वाहने काही दिवसांपूर्वी झालेल्या धुवाँधार पावसात चक्क पाण्याखाली गेली. आता त्या वाहनांच्या दुरूस्तीवरून वाहनमालक आणि पालिका प्रशासन यांच्यात वाद सुरू झाला आहे. (Fight between Mumbaikars and BMC as 400 vehicles submerged after heavy rain floods parking lot in Kandivali nss91)
मुंबईत झालेल्या तुफान पावसामुळे सखल भागात पाणी साचलं. त्यामुळे रस्यावर उभी असलेली वाहने पाण्याखाली गेली. कांदिवलीच्या ठाकूर कॅाम्पेक्समध्ये महापालिकेची 'पे & पार्क'ची जागा आहे. या पार्किंगमध्येही पाणी साचलं होतं. त्यामुळे पार्किंगमध्ये असलेली तब्बल ४०० वाहने पाण्याखाली गेली. अंडरग्राउंड पार्किंगमध्ये २० फूटांच्यावर पाणी साचले होते. त्यामुळे सुमारे 400 वाहने पाण्याखाली बुडाल्याची माहिती सुत्रांनी दिली. याच पार्श्वभूमीवर आता वाहनांच्या दुरुस्तीचा प्रश्नावरून वाद उपस्थित झाला आहे. वाहन दुरुस्तीसाठी लाखो रुपयांचा खर्च येणार आहे. त्यातचं शोरुममध्ये बुकिंग फूल झाल्याने अनेक वाहनमालकांना ३ ते २० दिवस वाहन दुरुस्तीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. ज्यांची वाहने पाण्यात पूर्णपणे बुडाली, अशांना विमा कंपन्यांच्या चेकिंगसाठीही प्रतीक्षा करावी लागत आहे.
वाहनांच्या नुकसानाला महापालिका जबाबदार आहे. महापालिकेकडून वाहने सर्व्हिस सेंटरमध्ये परस्पर नेण्यात आली. त्यामुळे वाहनांच्या दुरुस्तीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. महापालिकेने याचा खर्च करावा, अशी भावना वाहनांच्या मालकांनी व्यक्त केली. तर, या वाहनांच्या दुरूस्तीची जबाबदारी मुंबई पालिकेची नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
माझी कार दोन दिवस पाण्यात बुडाली होती. त्यामुळे कारचं मोठं नुकसान झालं. कारचं इंजिन, बॅटरी, सीट्स आणि चेसी पूर्णपणे खराब झाली आहे. एका महिन्यासाठी मी २ हजार २०० रुपये पार्किंगसाठी देतो. विम्यासाठी मी पत्र पाठवले आहे. त्यामुळे विमा कंपन्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा मला आहे. सर्व्हिस सेंटरमध्ये कार दुरुस्त होण्यासाठी किमान एक महिन्याचा कालावधी लागेल, असं मला वाटतंय.
-संतोष मिराशी, वाहनमालक (स्विफ्ट डिझायर), कांदिवली
------
मी आत्ताच मुंबईच्या आर नॉर्थ वॉर्डच्या कामासाठी रुजू झाले. आमचे इंजिनियर्स काम करत आहेत. ते याबाबत माहिती देतील.
-संध्या नांदेकर, अतिरिक्त आयुक्त, महापालिका
------
महापालिका वाहनांच्या नुकसानासाठी जबाबदार नाही. वाहने पार्किंगमध्ये असली तरीही हे सारं नेसर्गिक आपत्तीमुळे घडलं आहे.
-इंजिनीअर महादेव शिंदे, मुंबई पालिका
सर्व्हिस सेंटरमध्ये वाहनांचा बॅकलॅाग
सर्व्हिस सेंटरमध्ये दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणावर वाहनांची नोंद झाली आहे. त्यामुळे वाहनांच्या बॅकलॅागची समस्या निर्माण झाली आहे. ही समस्या सोडवण्यासाठी रात्रंदिवस काम करावं लागत आहे. कामाचा ताणही प्रचंड वाढला आहे. कार मालक दुरुस्तीसंदर्भात सातत्याने चौकशी करत आहेत. सध्या ११५ कार दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. एका कारला किमान ४-५ दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे, अशी माहिती गोरेगावच्या मोदी ह्युंडई शोरूमच्या एका अधिकाऱ्याने दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.