यंदा पावसाळ्यात मुंबईकरांना कोरोनासोबत 'या' परिस्थितीचा देखील करावा लागणार सामना?

mumbai rain
mumbai rain

ठाणे : कोरोनासोबतच यंदा पावसाळ्यात पूरस्थितीशी लढा द्यावा लागणार आहे. यंदा पावसाळ्यात जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये तब्बल 20 दिवस समुद्राला उधाण येणार आहे, अशी माहिती पंचागकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली आहे. महिनाभरावर येऊन ठेपलेल्या पावसात उधाणाच्या कालावधीत अतिवृष्टी झाल्यास मुंबई, ठाणे परिसर जलमय होऊन मोठ्या नैसर्गिक संकटाला सामोरे जावे लागण्याची भीती आहे.

गेल्या दीड महिन्यापासून नागरिकांचे कोरोनाशी युद्ध सुरू आहे. कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे उदभवलेल्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी सर्वच यंत्रणा कार्यरत आहेत. एकीकडे कोरोनाशी दोन हात करत असतानाच मे उजाडल्याने जून, जुलै, ऑगस्टमधील पावसाळ्याचे वेध सुरू झाले आहेत. पावसाळ्यात समुद्राच्या उधाण भरतीच्यावेळी जोराचा पाऊस झाल्यास मुंबई, ठाण्यासारख्या शहरात पाणी तुंबण्याची जास्त शक्यता असते. समुद्राला जून, जुलै, ऑगस्टमध्ये साडेचार मीटरपेक्षा जास्त भरती येणार असलेले दिवस, वेळ आणि समुद्राच्या पाण्याची उंची याकडे खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी लक्ष वेधले आहे. यंदा जूनमध्ये 4 ते 9 जून तसेच 23 व 24 जून, जुलैमध्ये 4 ते 7 आणि 21 ते 24 जुलै असे प्रत्येकी आठ, तर ऑगस्टमध्ये 19 ते 22 ऑगस्ट हे चार दिवस असे पावसाळ्यात एकूण 20 दिवस समुद्राला उधाण भरती असून यादिवशी भरतीच्या पाण्याची उंची 4.5 मीटरपेक्षा अधिक असणार आहे.

किनारपट्टी भागात काळजी घेण्याचे आवाहन
पावसाळ्यात येणाऱ्या उधाणाची उंची ही लाटेची नसून भरतीच्या पाण्याची असल्याने किनारपट्टीच्या भागातील नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचे दा. कृ. सोमण यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे, यंदा कोरोनासोबतच 26 जुलै 2005 सारख्या पुरस्थितीचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उधाणाचे दिवस,वेळ व पाण्याची उंची
गुरुवार 4 जून सकाळी 10:57, पाण्याची उंची 4.56 मीटर.
शुक्रवार 5 जून सकाळी 11:45, पाण्याची उंची 4.75 मीटर.
शनिवार 6 जून दुपारी 12:33, पाण्याची उंची 4.82 मीटर.
रविवार 7 जून दुपारी 1:19, पाण्याची उंची 4.78 मीटर.
सोमवार 8 जून दुपारी 2:04, पाण्याची उंची 4.67 मीटर.
मंगळवार 9 जून दुपारी 2:48, पाण्याची उंची 4.50 मीटर.
मंगळवार 23 जून दुपारी 1:43, पाण्याची उंची 4.52 मीटर.
बुधवार  24 जून दुपारी 2:25, पाण्याची उंची 4.51 मीटर.
शनिवार 4 जुलै सकाळी 11:38, पाण्याची उंची 4.57मीटर.
रविवार 5 जुलै दुपारी 12:23, पाण्याची उंची 4.63मीटर.
सोमवार 6 जुलै दुपारी 1:06, पाण्याची उंची 4.62 मीटर.
मंगळवार 7 जुलै दुपारी 1:46, पाण्याची उंची 4.54 मीटर.
मंगळवार 21 जुलै दुपारी 12:43, पाण्याची उंची 4.54 मीटर.
बुधवार 22 जुलै दुपारी 1:22, पाण्याची उंची 4.63 मीटर.
गुरुवार 23 जुलै दुपारी 2:03, पाण्याची उंची 4.66 मीटर.
शुक्रवार 24 जुलै दुपारी 2:45, पाण्याची उंची 4.61 मीटर.
बुधवार 19आॅगस्ट दुपारी 12:17, पाण्याची उंची 4.61 मीटर.
गुरुवार 20 आॅगस्ट दुपारी 12:55, पाण्याची उंची 4.73 मीटर.
शुक्रवार 21 आॅगस्ट दुपारी 1:33, पाण्याची उंची 4.75 मीटर.
शनिवार 22 आॅगस्ट दुपारी 2:14, पाण्याची उंची 4.67 मीटर.

Fight the rainy season with Corona to mumbaikars

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com