मोठी बातमी - ...नाहीतर येत्या काळात त्या खासगी डॉक्टर्सचे परवाने होणार रद्द !

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 मे 2020

महापालिकेनं वारंवार आवाहन करुनही अनेक खासगी डॉक्टर्स आपले दवाखाने, नर्सिंग होम सुरु ठेवलेले नाहीत. त्यामुळे, मान्यताप्राप्त आणि पदवीधारक डॉक्टरांनी कोविड रुग्णालयांमध्ये सेवा देण्याबाबत आदेश काढण्यात आले आहेत. 

मुंबई - कोरोनाचे वाढते रुग्ण आणि त्यातून होणार्या  प्रादुर्भावाचे प्रमाण पाहता पालिका आणि सरकारी रुग्णालयांमध्ये मोठी गर्दी होत आहे. खासगी रुग्णालयांमध्ये ही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. याच्याच पार्श्वभूमीवर, खासगी रुग्णालयातील डॉक्टरांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. खासगी डॉक्टरांनी किमान 15 दिवस कोविड-19 चे रुग्ण असलेल्या रुग्णालयांमध्ये सेवा द्यावी असे आवाहन वैद्यकिय शिक्षण-संशोधन मंडळ संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी केले आहे.

महापालिकेनं वारंवार आवाहन करुनही अनेक खासगी डॉक्टर्स आपले दवाखाने, नर्सिंग होम सुरु ठेवलेले नाहीत. त्यामुळे, मान्यताप्राप्त आणि पदवीधारक डॉक्टरांनी कोविड रुग्णालयांमध्ये सेवा देण्याबाबत आदेश काढण्यात आले आहेत. 

मुंबईच्या सर्व बातम्या एका क्लिकवर ! वाचा मुंबईच्या सर्व महत्त्वाच्या बातम्या... !!! 

या आवाहनाला प्रतिसाद न दिल्यास खाजगी डॉक्टरांवर कारवाई केली जाऊ शकते, असही सांगण्यात आले आहे. मुंबईतील खासगी डॉक्टरांना सरकारी रुग्णालयांमध्ये काम करणे अनिवार्य केले गेले आहे. या आदेशाचे पालन जर झाले नाही तर त्यांचे परवाने रद्द केले जाणार आहेत. 

जवळपास 25 हजारांपेक्षा जास्त खासगी डॉक्टर्स आणि मेडिकल प्रॅक्टिशनर्सना कोव्हिड रुग्णालयात किमान 15 दिवसांसाठी काम करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे यापुढे खासगी डॉक्टरांना कोव्हिड रुग्णालयात काम करणे बंधनकारक आहे. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने हे आदेश जारी केले आहेत.

फक्त दोन दिवस वाईन शॉप्स उघडलेत आणि मिळवला 'इतक्या' कोटींचा महसूल..

डॉक्टरांना फॉर्म भरुन याबद्दल माहिती द्यावी लागणार आहे. कोणतं रुग्णालय जवळ आहे आणि त्यांना कोणत्या रुग्णालयात आपली सेवा द्यायला आवडेल हे या फॉर्ममध्ये भरुन द्यावे लागणार आहे.  खासगी डॉक्टरांसाठी एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यांना 15 दिवस सरकारच्या कोव्हिड रुग्णालयांमध्ये काम करणे बंधनकारक आहे. - डॉ. तात्याराव लहाने, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे अतिरिक्त संचालक. 

licences of private doctors will be cancelled in they dont contribute in government hospital 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: licences of private doctors will be cancelled in they dont contribute in government hospital