esakal | ठाकरे सरकारवर 302 चा गुन्हा दाखल करा, ST कर्मचाऱ्याच्या आत्महत्येवरुन भाजप आक्रमक
sakal

बोलून बातमी शोधा

ठाकरे सरकारवर 302 चा गुन्हा दाखल करा, ST कर्मचाऱ्याच्या आत्महत्येवरुन भाजप आक्रमक

एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्येच्या पूर्वी लिहिलेल्या चिट्ठीत ठाकरे सरकारवर आरोप केला. आता कोणावर गुन्हा दाखल करणार, आता कुणाला अटक करणार असा प्रश्न  विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला आहे.

ठाकरे सरकारवर 302 चा गुन्हा दाखल करा, ST कर्मचाऱ्याच्या आत्महत्येवरुन भाजप आक्रमक

sakal_logo
By
प्रशांत कांबळे

मुंबई: अन्वय नाईकच्या आत्महत्या प्रकरणात नाव आल्यानंतर अर्णब गोस्वामींवर गुन्हा दाखल होतात. त्यांना अटक करता मग आता एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्येच्या पूर्वी लिहिलेल्या चिट्ठीत ठाकरे सरकारवर आरोप केला. आता कोणावर गुन्हा दाखल करणार, आता कुणाला अटक करणार असा प्रश्न  विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला आहे. तसंच ठाकरे सरकारवर 302 चा गुन्हा दाखल करावा अशी मागणीही प्रवीण दरेकर यांनी समाज माध्यमांवरून केली आहे. 

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना प्रलंबित वेतन मिळत नसल्याने दोन कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्या केली आहे. त्यापैकी जळगाव येथील एसटी मृतक एसटी कर्मचाऱ्याने एसटीच्या व्यवस्थेवर बोट उचलत, उद्धव ठाकरे सरकार या परिस्थितीला जबाबदार असल्याचे चिट्ठीत लिहिले आहे. त्यावरून विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. 

एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार ठाकरे सरकारवर 302 चा गुन्हा दाखल करावा त्यासोबतच तात्काळ एसटी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा टोकाचा संघर्ष एसटी कर्मचारी करतील, त्यामध्ये राजकारणाच्या पलीकडे जाऊन एसटी कर्मचाऱ्यांना संघर्षात विरोधी पक्षही सामील होईल असा इशाराही प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.

अधिक वाचाः मुंबईतील मल्टीप्लेक्सवर रंगभूमी कर वाढवण्याचा निर्णय; प्रत्येक शोसाठी हजार रुपयांचा भुर्दंड

वेतन न मिळाल्याने दोन एसटी कर्मचार्‍यांनी आत्महत्या केल्या. अतिशय वेदनादायी, मनाला अस्वस्थ करणार्‍या घटना आहे. एसटी कर्मचार्‍यांच्या व्यथा आणि वेदनासंदर्भात सातत्याने पत्रव्यवहार करून सुद्धा राज्य सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही. ऐन दिवाळीच्या तोंडावर दोन कुटुंब उघड्यावर आली आहेत. आता तरी सरकारने जागे व्हावे.

एसटी कर्मचार्‍यांची कुटुंब अतिशय हलाखीच्या स्थितीत आहेत. जळगाव आणि रत्नागिरीच्या या दोन घटनांसाठी जे दोषी आहेत, त्यांच्यावर काय कारवाई करणार ? 
या आत्महत्यांची जबाबदारी सरकार घेणार का ? असा प्रश्न माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

अधिक वाचाः  आयडॉलच्या प्रथम वर्ष प्रवेशास सुरुवात; महाविद्यालय व आयडॉलचा अभ्यासक्रम एकच

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवहन मंत्री ऍड.अनिल परब यांच्यावर 302 चा गुन्हा दाखल करण्याचे वक्तव्य केले त्यावरून, परब यांनी आधी दरेकर यांनी कलमांचा अभ्यास करून यावा असा टोला हाणला आहे.

---------------------------------

(संपादनः पूजा विचारे)

File 302 case against Thackeray government BJP is aggressive over ST employee Died