चित्रपट निर्माता फिरोज नाडियादवाला यांच्या पत्नीला ड्रग्सप्रकरणी अटक; आणखी काही हायप्रोफाल ग्राहक रडावर

चित्रपट निर्माता फिरोज नाडियादवाला यांच्या पत्नीला ड्रग्सप्रकरणी अटक; आणखी काही हायप्रोफाल ग्राहक रडावर

मुंबई   -  बॉलिवूडच्या ड्रग्ज कनेक्शनबाबत तपास करणा-या केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने(एनसीबी) दिवसभर चित्रपट निर्माते फिरोज नाडियादवाला यांच्या घरी शोध मोहिम राबवली. याप्रकरणी नाडियादवाला यांची पत्नी शबाना सईद(20) हिच्यासह आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. एनसीबीने  निर्माता फिरोज नाडियादवाला यांनाही समन्स बजावले आहे.

एनसीबीने दिवसभर मालाड, अंधेरी, लोखंडवाला, खारघर, कोपरखैरनेसह काही भागातशोध मोहिम राबवली. यापूर्वी याप्रकरणी अब्दुल वाहीद ऊर्फ सुल्तान मिर्झा याला अंधेरीतील आझाद नगर परिसरातून एनसीबीच्या अधिका-यांनी अटक केली होती. त्याच्या इनोव्हा कारमधून 750 ग्रॅम गांजा, 75 ग्रॅम चरस, तीन ग्रॅम मेफेड्रॉन(एमडी) जप्त करण्यात आली आहे. याशिवाय एक लाख 75 हजार रुपयांची रोख रक्कमही त्याच्याकडून जप्त करण्यात आली आहे. वर्सोवा, लोखंडवाला व यारी रोड परिसरात राहणा-या काही हायप्रोफाईल व्यक्तींचे संपर्क क्रमांक त्याच्या मोबाईलमध्ये सापडले आहेत. त्याप्रकरणी सुल्तानच्या चौकशीतून त्याने शबानाला गांजा विकल्याचे निष्पन्न झाले. या माहितीच्या आधारे जेव्हीपीडी येथील गुलमोहोर क्रॉस लेन येथे शोध मोहिम राबवली. त्यात सुल्तानकडून खरेदी केलेलाय 10 ग्रॅम गांजा सापडला. त्यानंतर शबाना सईदला एनसीबीने नोटीस पाठवून त्यांचा जबाब नोंवदला.

जबाब नोंदवण्यात आल्यानंतर अखेर तिला याप्रकरणी अटक करण्यात आली. आतापर्यंत याप्रकरणी एकूण 727.1 ग्रॅम गांजा, 74.1 ग्रॅम चरस व 95.1 ग्रॅम मेफेड्रॉन जप्त करण्यात आले आहे. त्याची किंमत तीन लाख 58 हजार 610 रुपये आहे. याप्रकरणी आतापर्यंत यावेळी एनसीबीने पाच ड्रग्ज पेडलर्सना अटक केली आहे. याप्रकरणी एनसीबी अधिक तपास करत असून सुल्तान मिर्झाच्या संपर्कात असलेल्या आणखी हायप्रोफाईल ग्राहकांचा शोध सुरू आहे.

Filmmaker Feroz Nadiadwalas wife arrested in drug case

-------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com