अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना ग्रेस गुण मिळणार ; गुण ठरविण्याची जबाबदारीही लीड महाविद्यालयांवर

तेजस वाघमारे
Wednesday, 30 September 2020

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विद्यापीठाची अंतिम वर्षाची परीक्षा बहुपर्यायी प्रश्नांच्या आधारे घेण्यात येत आहे. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांना वाढीव गुण अर्थात ग्रेस गुण मिळणार की नाही याबाबत शंका होती

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विद्यापीठाची अंतिम वर्षाची परीक्षा बहुपर्यायी प्रश्नांच्या आधारे घेण्यात येत आहे. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांना वाढीव गुण अर्थात ग्रेस गुण मिळणार की नाही याबाबत शंका होती. मात्र विद्यापीठाने परिपत्रक काढून हा संभ्रम दूर केला असून आता विद्यार्थ्यांना ग्रेस गुण देण्यात येणार आहेत. गुण ठरविण्याची जबाबदारीही विद्यापीठाने लीड महाविद्यालयांवर सोपविली आहे.

यंदा अंतिम वर्षाचे विद्यार्थी प्रथमच बहुपर्यायी प्रश्न आणि ऑनलाइन परीक्षा देत आहेत. यामुळे नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना वाढीव गुण देण्याचा विद्यापीठाचा निर्णय स्वागतार्ह असल्याचे मत काही प्राचार्यांनी व्यक्त केले आहे.

महत्वाची बातमीबॉलिवूडमधील तीन सुपर-डुपर स्टार्स NCB च्या रडारवर, नावांची आद्याक्षरं आहेत एस,आर आणि ए

मात्र हे गुण नेमके कसे व कोणत्या प्रमाणात द्यायचे याबाबत विद्यापीठाने अधिक स्पष्टीकरण द्यावे असे मत काही प्राचार्यां व्यक्त करत आहेत. यापूर्वी सविस्तर उत्तरे द्या अशा स्वरुपातील परीक्षा होत असे. त्यावेळेस विद्यार्थ्यांना वाढीव गुण देणे सोपे जात होते. मात्र आता बहुपर्यायी प्रश्न असल्याने हे गुण नेमके कसे द्यायचे याचे सूत्र काय असेल याबाबतत विद्यापीठाने स्पष्टता आणावी असेही प्राचार्यांचे म्हणणे आहे.

तसे झाले नाही तर प्रत्येक महाविद्यालये आपल्या पद्धतीने हे गुण देतील. यामध्ये हुशार विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

final year exams students will get grace marks though pattern in of MCQ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: final year exams students will get grace marks though pattern in of MCQ