अखेर! अंतिम वर्षांच्या परिक्षेबाबत निर्णय झाला; जाणून घ्या सविस्तर

सकाळ वृत्तसेवा 
Friday, 19 June 2020

अखेर ठाकरे सरकारनं यावर निर्णय घेऊन याबाबतची घोषणा केली आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे

 

मुंबई- अंतिम वर्षाच्या परिक्षेवरून बराच राजकीय गोंधळ पाहायला मिळाला.  यावरून विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारला अनेक प्रश्नांनी घेरलं होतं. अखेर ठाकरे सरकारनं यावर निर्णय घेऊन याबाबतची घोषणा केली आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला असल्याची घोषणा तनपुरे यांनी केली आहे.  

शाब्बास ! IIT मुंबईच्या विद्यार्थ्यांनी बनवलं स्वतःचं नॅव्हिगेशन तंत्रज्ञान.. 

तनपुरे यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. महाविकासआघाडी सरकार विद्यार्थ्यांच्या बाजूने! अंतिम वर्ष परीक्षांबाबत आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक झाली. बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला. व्यावसायिक अभ्यासक्रमांबाबतही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय रेग्युलेटरी बॉडींना कळवण्याचा निर्णय झाला, असं ट्विट त्यांनी केलं.

 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठांच्या व्यावसायिक आणि कला, विज्ञान, वाणिज्य आदी पारंपरिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यासारखी परिस्थिती सध्या तरी राज्यात नाही. त्यामुळे या परीक्षा न घेण्याचा निर्णय उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने घेतला होता. मात्र, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सरकारचा हा निर्णय फेटाळून लावला. कायद्यानुसार अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याची भूमिका मांडल्याने सरकारपुढे मोठा पेच निर्माण झाला होता. 

मुंबई परिसरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी याबाबत घेतलेल्या बैठकीत पारंपरिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाचा पुनरुच्चार केला. बैठकीस उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, विद्यापीठांचे कुलगुरू आणि विभागाचे सचिव उपस्थित होते. विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करून सरासरी गुणांच्या आधारे मूल्यांकन करण्याचा निर्णय आधीच घेण्यात आला आहे.

सावधान ! हॅन्ड सॅनिटायझरच्या ऐवजी मिळतोय हॅन्ड क्लिनर..

दरम्यान राज्यपालांनी या निर्णयाला विरोध केला. त्यातच राज्य सरकार आपल्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर ठाम आहे. त्यामुळे राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल असा नवा संघर्ष होण्याची शक्यता आहे, अशा चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The final year exams were decided; Learn in detail