esakal | अखेर लोकल ट्रेन धावली! पण केवळ मर्यादित प्रवाशांसाठी, 'या' आहेत अटी
sakal

बोलून बातमी शोधा

अखेर लोकल ट्रेन धावली! पण केवळ मर्यादित प्रवाशांसाठी, 'या' आहेत अटी
  • राज्य सरकारअंतर्गत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच ही लोकल सेवा सुरू झाली आहे.
  • सकाळी 5.30 वाजल्यापासून रात्री 11.30 वाजेपर्यंत सरासरी 15 मिनिटांनी लोकल सेवा सुरू असणार आहे. 

अखेर लोकल ट्रेन धावली! पण केवळ मर्यादित प्रवाशांसाठी, 'या' आहेत अटी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई- गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असलेली मुंबईची लाईफलाईन उपनगरी रेल्वेसेवा आजपासून पुन्हा रुळावर आली आहे. आज पहाटे साडे पाच वाजता चर्चगेटहून विरारसाठी पहिली लोकल रवाना झाली. राज्य सरकारअंतर्गत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच ही लोकल सेवा सुरू झाली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर 146 उपनगरीय फेऱ्या धावणार आहेत. त्या चर्चगेट ते डहाणू रोड या मार्गावर धावतील. बहुतांश लोकल या जलद मार्गाने चालविण्यात येतील. सकाळी 5.30 वाजल्यापासून रात्री 11.30 वाजेपर्यंत सरासरी 15 मिनिटांनी लोकल सेवा सुरू असणार आहे. 

मुंबई परिसरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच ही लोकल सुरू करण्यात आली आहे. पहाटे रवाना झालेल्या पहिल्या ट्रेनमध्ये एकही प्रवासी नव्हता. मात्र, दुसऱ्या संपूर्ण ट्रेनमध्ये केवळ तीन ते चार प्रवासी होते. सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळत हे प्रवासी बसले होते. सर्व सामान्य नागरिकांना या लोकलमधून प्रवास करण्यास मुभा नसेल. 

सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळता यावेत म्हणून एका फेरीत केवळ 700 प्रवासीच प्रवास करू शकणार आहेत. तसंच रेल्वेतून प्रवास करताना मास्क लावणे बंधनकारक करण्यात आलंय. प्रवाशांनी विनाकारण गर्दी करू नये असं आवाहन रेल्वेकडून करण्यात आलं आहे.

लोकल या चर्चगेट ते विरार या दरम्यान धावणार आहे. या लोकल चर्चगेट ते बोरीवली दरम्यान जलद तर त्यापुढे धीम्या गतीने धावतील. विरार ते डहाणू या मार्गावर 16 लोकल धावतील. पश्चिम रेल्वेच्या लोकल चर्चगेट, मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे, अंधेरी, बोरिवली या स्थानकांवर आणि त्यानंतर दहिसर ते विरार दरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील. 

वाचा ः अत्यावश्यक सेवेसाठी आजपासून लोकल धावणार

दुसरीकडे मध्य आणि हार्बरवर जलद मार्गावर लोकल चालवण्यात येणारेत. मध्य रेल्वे मार्गावर अप आणि डाऊन अशा 200 फेऱ्या सुरू होतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कसारा, कर्जत, कल्याण, ठाणे या मार्गांवर 130 लोकल फेऱ्या होतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल या मार्गावर 70 फेऱ्या होतील. कार्यालयीन वेळांप्रमाणे सकाळी 7, 9, दुपारी 3 सायंकाळी 6, रात्री 9, 11 याप्रमाणे गाड्या चालवण्यात येणार आहेत. 

शेवटची लोकल ही रात्री 11.30 वाजता सुटेल. चर्चगेट-विरार, विरार-डहाणू, सीएसएमटी-कल्याण, सीएसएमटी-पनवेल या मार्गांवर लोकल धावतील. अप आणि डाऊन दिशेला दर 15 ते 20 मिनिटांनी लोकल धावेल. अत्यावश्यक सेवेचे ओळखपत्र पाहूनच प्रवाशांना रेल्वे स्थानकांत प्रवेश देण्यात येणार असल्यानं इतर प्रवाशांना लोकलमधून प्रवास करता येणार नाही आहे.

loading image
go to top